file photo 
मराठवाडा

व्हिडिओ : प्रथमच भाविकांविना नृसिंह जन्मोत्सव

कैलास चव्हाण

परभणी : दरवर्षी हजारो भाविकांच्या गर्दीत मोठ्या उत्साहात साजरा होणारा पोखर्णी (नृसिंह) (ता. परभणी)  येथी  नृसिंह जन्मोत्सवाचे बुधवारी (ता. सहा) सकाळचे कार्यक्रम मोजक्याच  पुजाऱ्यांच्या  उपस्थितीत पार पडले. लॉकडाउनमुळे सर्व कार्यक्रम रद्द केल्याने भाविकांचा हिरमोड झाला असून भाविकांना दुरूनच दर्शन घेण्याची प्रथमच वेळ आली आहे.

दरवर्षी श्री नृसिंह जयंतीनिमित्त पोखर्णी येथे सप्ताह असतो. या सोहळ्यासाठी परराज्यातूनही भाविक येत असतात. जयंतीदिनी मुख्य कार्यक्रम पार पडत असतो. त्यासाठी हजारोंच्या संख्येने भाविक पोखर्णीत दाखल होत असतात. पोखर्णी गावातील प्रत्येक नागरिक आपल्या कुटुंबासह मंदिर परिसरात आलेला असतात. फुलांचा वर्षाव, दर्शनासाठी लांब लागलेली रांग, सायंकाळी मुख्य कीर्तन, जन्मवेळी आनंदाने उधळला जाणारा गुलाल, भजनात तल्लीन झालेले भाविक, दुसऱ्या दिवशी निघणारी पालखी मिरवणूक असा भक्तीचा थाट दरवर्षी डोळ्याचे पारने फेडणारा असतो. यंदा मात्र, कोरोनामुळे लॉकडाउन आहे. त्यामुळे मंदिर मागील महिन्यातच बंद करण्यात आले आहे. त्यामुळे यंदाचा जन्मोत्सव कार्यक्रमदेखील रद्द करून घरीच जन्मोत्सव साजरा करण्याचे आवाहन मंदिर समितीने केले होते. त्यानुसार बुधवारी (ता. सहा) पोखर्णीसह सर्व भाविकांच्या घरीच जन्मोत्सव साजरा करण्यात आला. कार्यक्रम रद्द असल्याने मंदिर परिसरात मोजकेच भाविक दिसून आले. त्यांनीही मुख्य दरवाजा बंद असल्याने दुरूनच दर्शन घेतले.

मंदिराची आकर्षक अशी फुलांनी सजावट
सकाळी मुख्य पुजाऱ्यांनी शाश्वत पुजा केली.यावेळी देवाला फळांची आरास करण्यात आली होती. कार्यक्रम रद्द असले तरी मंदिराची आकर्षक अशी फुलांनी सजावट करण्यात आली आहे. विविध रंगाच्या फुलांच्या माळांनी मंदिर सजले होते. मुख्य गाभाऱ्यादेखील विविध फुले, फळांची आरास होती. गावातील व परिसरातील मोजक्याच भावीकांनी मंदिर परिसरात येत दुरुन नृसिंह दर्शनाचा लाभ घेतला.

ऑनलाइन दर्शनाची सोय
मंदिर समितीने बुधवारी सकाळी झालेल्या कार्यक्रमाचे चित्रण यू ट्युबवर उपलब्ध करून दिले. त्यामुळे अनेक भाविकांनी आॅनलाइन पद्धतीने दर्शन घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Interim PM Sushila Karki : नेपाळच्या अंतरिम पंतप्रधान सुशीला कार्की यांचे भारतातील ‘या’ प्रसिद्ध तीर्थक्षेत्राशी आहे खास नाते!

Latest Marathi News Updates : खरीप हंगाम पूर्ण वाया गेल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात

Nitin Gadkari : ४०००० कोटींचे उत्पन्न... ७० लाख नोकऱ्या, गडकरींनी दिलेला कमाईचा मंत्र काय आहे?

Viral: वजन कमी करा आणि पैसे मिळवा... प्रसिद्ध कंपनीची अनोखी ऑफर, १८ किलो वजन कमी करणाऱ्याला २,४६,८४५ रुपये दिले

Marriage Registration Issue : सहा महिन्यांपासून विवाह नोंदणी पोर्टल ठप्प; हजारो विवाहांची नोंदणी रखडली

SCROLL FOR NEXT