The number of 16 corona patients has increased in Hingoli district
The number of 16 corona patients has increased in Hingoli district 
मराठवाडा

जिल्ह्यात कोरोनाचा आलेख वाढला, शुन्यावर आलेला आकडा पोहचला सोळावर

राजेश दारव्हेकर

हिंगोली : जिल्ह्यात मागच्या काही दिवसांपासून कोरोनाचा आलेख वाढण्यास सुरुवात झाली आहे. मागच्या आठवड्यात शुन्यावर आलेली ही, संख्या आता १६ वर पोहोचली आहे. यामुळे नागरिकांनी देखील कोरोनाचे नियम पाळत, मास्कचा वापर नियमित करणे आवश्यक झाले आहे. जिल्हा प्रशासनाने संबंधित विभागाला जनजागृती करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. प्रशासन देखील यासाठी उपाय योजना करीत आहे. हिंगोली शहरात मागच्या काही दिवसापासून पालिका प्रशासनाने स्पिकरवर कोरोना संदर्भात नियमाचे पालन करण्याचे आवाहन नागरिकांना करणे सुरू केले आहे. तसेच मंगल कार्यालयात देखील नियमाचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. येथे होणाऱ्या कार्यक्रमास गर्दी होणार नाही, याची खबरदारी घ्यावी असे सांगितले आहे. 

औंढा नागनाथ शहरात देखील पोलिस प्रशासनाने फेरी काढत स्पिकरवरुन कोरोना संदर्भात जनजागृती केली आहे. मास्कचा वापर करा, वेळोवेळी हात स्वच्छ धुवा, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा आदी सूचना दिल्या आहेत. तसेच आरोग्य विभागाने देखील चाचण्या वाढविल्या आहेत. जिल्ह्यात मागच्या आठवड्यात शून्यावर आलेली संख्या हळूहळू वाढत सोळावर पोहचली आहे. कोरोनाची दुसरी लाट सुरु झाली आहे. टप्पाटप्याने कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहेत. जिल्हा प्रशासनाने सर्व यंत्रणेला जनजागृती करुन खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

दरम्यान, हिंगोली जिल्ह्यात शुक्रवारी (ता.१९ ) १६ रुग्ण आढळून आले आहेत. दोन रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी दिली. आढळलेले १६ रुग्ण आरटीपीसीआर टेस्टमध्ये आढळून आले आहेत. दोन रुग्ण बरे झाल्यामुळे त्याला सुट्टी देण्यात आली. आजपर्यंत जिल्ह्यात एकूण तीन हजार ८६४ रुग्ण झाले आहेत. त्यापैकी  तीन हजार ७२९ रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली. आजघडीला एकूण ७७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत आणि ५८ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Update: वडेट्टीवारांचे आरोप खरे, उज्वल निकम यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा; एस. एम. मुश्रीफ यांची मागणी

ICC Player of The Month : यादीत भारताचा एकही खेळाडू नाही, युएई अन् पाकिस्तानचे क्रिकेटर आघाडीवर

अनेक राज्यांना मिळणार कडक उन्हापासून दिलासा, मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाची माहिती

Ramdas Athavale : आरक्षणाबाबत राहुल गांधींच्या आरोपांची निवडणुक आयोगाकडे तक्रार करणार; रामदास आठवले

Bernard Hill : 'टायटॅनिक'चा कॅप्टन ते 'लॉर्ड ऑफ रिंग्स'मधील राजा; बर्नार्ड यांनी 'या' भूमिका अजरामर केल्या

SCROLL FOR NEXT