dhrmabad.jpg
dhrmabad.jpg 
मराठवाडा

‘गावकरी किचन’मध्ये अधिकाऱ्यांचे श्रमदान

सुरेश घाळे


धर्माबाद, (जि. नांदेड) ः देशात व राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, गेल्या महिनाभरापासून लॉकडाउन आणि संचारबंदी लागू करण्यात आली आहे. परिणामी हातावर पोट असणाऱ्या आणि गोरगरिबांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. हाताला काम नसल्याने घरची चूल पेटणार कशी, अशा विवंचनेत अनेक कुटुंब आहेत. मात्र, संकटात मदतीला धावून जाणे ही आपली संस्कृती असल्याने कुणावरही उपाशी झोपण्याची वेळ येणार नाही. यासाठी उद्योजक सुबोध काकाणी यांनी मित्र परिवाराच्या मदतीने ‘गावकरी किचन’ या संकल्पनेतून लॉकडाउनच्या संकटात गरजवंतांसाठी मदतीला धावून आले. गावकरी किचनमध्ये दररोज सुमारे २० ते २२ हजार खिचडीचे पाकीट अन्नदान होत असून बुधवारी (ता. २२) धर्माबादेतील चक्क वरिष्ठ अधिकारीच श्रमदान केरीत आहेत.

कोरोना या महाभयंकर रोगामुळे संपूर्ण जग ठप्प झाले आहे. यामुळे देशाला व राज्याला फटका बसला आहे. यातून एक गोष्ट समोर आली, ती म्हणजे...ज्या माणुसकीचा आपल्याला विसर पडत होता. त्या माणुसकीची ओळख निसर्गाने पुन्हा पटवून दिली आहे. प्रत्येक जण नेहमी स्वतःला न्याय मिळावा म्हणून अप्रत्यक्षरीत्या स्वतःशी आणि प्रत्यक्षरीत्या समाजाशी लढत असतो. मात्र, लॉकडाउनच्या काळात प्रत्येक नागरिक संकटात सापडलेल्या दुसऱ्या नागरिकाला मदतीचा हात देतोय. ना इथे कोणी एका जातीचा आहे, ना कोणी पंथाचा... प्रत्येक जीव दुसऱ्या जिवाची काळजी घेताना दिसतोय. ही लढाई लढताना अप्रत्यक्षरीत्या प्रत्येकाला माणुसकीचे दर्शन झाले आहे. संकट काळात सापडलेल्या बांधवांसाठी उद्योजक सुबोध काकाणी यांनी मित्र परिवाराच्या मदतीने ‘गावकरी किचन’च्या माध्यमातून माणुसकीने हात पुढे केला आहे. हे माणुसकीचे दर्शन गरजूंना सहाय्यभूत ठरत आहे.


२२ हजार खिचडीची पाकिटे अन्नदान
गावकरी किचनमध्ये दररोज सुमारे २० ते २२ हजार खिचडीची पाकिटे अन्नदान होत असून येथे सध्या श्रमदानाची चळवळ बनत आहे. सर्वसामान्यांपासून ते श्रीमंतांसह आता वरिष्ठ अधिकारीही सहभागी होत असून श्रमदान करण्यासाठी आकर्षिल्या जात आहेत. बुधवारी गावकरी किचनमध्ये चोवीस तास समाजाचे रक्षण करणारे उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील, उपविभागीय अधिकारी राजेंद्र शेळके, तहसीलदार दत्तात्रय शिंदे, पोलिस निरीक्षक सोहन माच्छरे, मुख्याधिकारी मंगेश देवरे यांच्यासह विविध विभागातील अधिकाऱ्यांनी जनतेसाठी भोजन बनवीत असलेल्या गावकरी किचनमध्ये श्रमदान करून माणुसकीचे दर्शन घडवित आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT