Kalamb News
Kalamb News Sakal
मराठवाडा

Kalamb News : चार हजाराची लाच घेताना येरमाळयाचे मंडळ अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात

दिलीप गंभिरे

कळंब : तालुक्यातील चोराखळी येथील देवस्थान जमिनीमधील मुरुमाची रॉयल्टी भरून न घेता वाहतुकीची परवानगी देण्यासाठी ४ हजार रुपयाची लाच स्वीकारताना तालुक्यातील येरमाळा येथील मंडळ अधिकारी देवानंद मरगु कांबळे याना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

ही कारवाही धाराशिव तहसील कार्यालयासमोर गुरवार (ता.२८) दुपारी एक वाजता करण्यात आली.दरम्यान या प्रकरणी मंडळ अधिकारी कांबळे याना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुध्द धाराशिव येथील आनंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाचलुचपत पथकाने दिलेल्या माहितीनुसार,तालुक्यातील चोराखळी येथे देवस्थान जमीन सर्व्हे नंबर ६३९ मधील ५० ब्रास मुरूमाची वाहतूक करण्याची मागणी तक्रारदार यानी तलाठ्याकडे केली होती.पण तिथे काही जुळून आले नाही.

त्यामुळे तक्रार दारानी येरमाळा येथील मंडळ अधिकारी देवानंद कांबळे यांची भेट घेवून देवस्थान जमिनीमधील मुरुमाची वाहतूक करण्यासाठी रॉयल्टी भरून न घेता व वाहतूक करीत असताना तलाठी यांच्याकडून कारवाई टाळण्यासाठी ४ हजार रुपये मंडळ अधिकारी कांबळे याना देण्याचे ठरले.

लाचलुपत पथकाने बुधवारी लाच प्रकरणी पडताळणी केली.गुरवारी मंडळ अधिकारी देवानंद कांबळे याना लाच स्वीकारताना धाराशिव तहसील कार्यालयासमोर रांगेहात पकडले.ही कारवाही लाचलुच प्रतिबंधक पथकाचे पोलिस निरीक्षक विकास राठोड,मधुकर जाधव,विशाल डोके यानी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबईकरांना IMD चा इशारा! पुढील 3 ते 4 तासांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, काळजी घेण्याचा सल्ला

Video: हिंदू-मुस्लीम ज्या दिवशी करेन, त्या दिवशी...; 'जास्त मुलांच्या' वक्तव्यावर PM मोदींनी दिलं स्पष्टीकरण

Gautam Gambhir: हार्दिकच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या डिविलियर्सवर भडकला गंभीर; म्हणाला, 'त्यांच्या कारकि‍र्दीत...'

Modi Road Show: PM मोदींचा उद्या घाटकोपरमध्ये 'रोड शो'; वाहतुकीत 'असे' असतील बदल

IPL 2024 DC vs LSG Live Score: लखनौ - दिल्लीमध्ये अटीतटीचा सामना! केएल राहुलने जिंकला टॉस, पाहा दोन्ही संघांचे प्लेइंग-11

SCROLL FOR NEXT