photo 
मराठवाडा

बापरे..! विहीर गेली चोरीला; शेतकऱ्याला पोलिस कोठडी

राजेश दारव्हेकर

हिंगोली ः येहळेगाव सोळंके (ता. औंढा नागनाथ) येथील एका शेतकऱ्याला विहीर नसताना चार हजार युनिटची वीजचोरी केल्याप्रकरणी महावितरण कंपनीने गुन्हा दाखल केला आहे. यावरून शेतकऱ्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडीची हवाही खावी लागली. ही घटना २०१८ मध्ये घडल्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले. आठ दिवसांपूर्वी शेतकऱ्याला चार्जसीट मिळाली. आता ही विहीर शोधून द्यावी, अन्यथा आत्महत्या करण्याचा इशारा शेतकऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.

या बाबत शेतकरी ज्ञानेश्वर सोळंके यांनी जिल्‍हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. श्री. सोळंके यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, सप्टेंबर (ता.२८) २०१८ मध्ये ते कामानिमित्त बाहेर गावी गेले होते. या वेळी महावितरण कंपनीचे सहायक अभियंता आश्विनकुमार मेश्राम व वरिष्‍ठ तंत्रज्ञ अमोल थोरात यांनी विहिरीवरून पाणीपुरवठा करण्यासाठी अनधिकृत वीजचोरी केल्याप्रकरणी श्री. सोळंके यांच्यावर गुन्हा दाखल केला.

चार हजार २८ युनिटच्या चोरीचा आरोप

गुन्हा दाखल झाल्यानंतर श्री. सोळंके यांनी शेतात विहीर नसल्याचे वेळोवेळी अधिकाऱ्यांना सांगितले. मात्र, त्‍यांचे म्‍हणणे एकून न घेता श्री. मेश्राम यांनी साक्षीदार शेख नजीर शेख वजीर, तातेराव चौरंगे यांच्या समक्ष पंचनाम करीत जुन्या विहिरीवर वीजचोरी करून चार हजार २८ युनिटची चोरी केल्याचे दाखविले. तसेच ७१ हजार ७८० रुपये वीजचोरीप्रकरणी दंड लावण्यात आला. याप्रकरणी सेनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. विहिरीचे फोटोदेखील काढल्याचा उल्‍लेख पंचनाम्यात आहे.

दोन दिवस पोलिस कोठडी

वास्‍तविक २०१८ मध्ये शेतकरी ज्ञानेश्वर सोळंके याच्या शेतात विहीर नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. या प्रकरणी वसमत न्यायालयात महावितरण कंपनीने चार्जशिट दाखल केल्यानंतर श्री. सोळंके यांना दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्यात आले. शेतकरी श्री. सोळंके यांना महाराष्‍ट्र रोजगार हमी योजनेंतर्गत (ता. एक) जानेवारी २०१९ मध्ये मिळालेल्या विहिरीचे काम पूर्ण झाले आहे.

जुनी विहीर असल्याचा दावा

तत्‍पूवी जुनी विहीर असल्याचा दावा महावितरण कंपनी करीत आहे. त्‍यामुळे श्री. सोळंके यांनी ज्या विहिरीमुळे त्‍यांच्यावर वीजचोरीचा गुन्हा दाखल केला, ती विहीर आता महावितरणच्या अधिकाऱ्यांनी शोधून द्यावी, अन्यथा आत्‍महत्या करण्याचा इशारा श्री. सोळंके यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

थकबाकी वसुली मोहीम जोरात

जिल्हाभरात अनेक ठिकाणी वीजबिल वसुली मोहीम सुरू करण्यात आली आहे. यासाठी थकबाकी न भरणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. दरम्यान, सध्या रब्बी हंगामातील पिकांना पाणी दिले जात आहे. मात्र, वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून केली जात आहे.

आठ दिवसांपूर्वी चार्जसीट मिळाली

ही घटना २०१८ मध्ये घडल्यानंतर फेब्रुवारी २०१९ मध्ये (ता. चार) गुन्हा दखल झाला. त्यानंतर न्यायालयात हे प्रकरण गेले. चार्जसीट मिळण्यासाठी बराच कलावधी लागला. आठ दिवसांपूर्वी चार्जसीट मिळाल्यानंतर जिल्‍हाधिकाऱ्यांना गुरुवारी (ता. सहा) निवेदन दिले आहे.
-ज्ञानेश्वर सोळंके, शेतकरी


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Martyr constable pension case: हुतात्मा जवानाच्या आईला पेन्शन नाकारली! उच्च न्यायालयाने दिले महत्त्वाचे आदेश

Pune Crime : येरवड्यात दारू पिताना वाद, लाकडी दांडक्याने मित्राचा खून

Maha Shivratri 2026 Travel Tips: महाशिवरात्रीला महादेवाच्या प्रसिद्ध मंदिरांना भेट द्यायला जाताय? मग 'या' 5 गोष्टी नक्की लक्षात ठेवा

RBI Rule: महत्त्वाची बातमी! आता १००% सुरक्षित निधीच मान्य; असुरक्षित हमींना पूर्णविराम, ब्रोकर्ससाठी आरबीआयचे कडक नियम लागू

Maha Shivratri 2026: भगवान भोलेनाथांकडून जीवनातील 'या' 4 महत्त्वाच्या गोष्टी शिका, कधीच येणार नाही अपयश

SCROLL FOR NEXT