beed corona recovery beed corona recovery
मराठवाडा

अक्षरशः कोरोनाला लोळवलं! वय ९८, स्कोअर १८ अन् ऑक्सिजन ७० होता तरीही जगण्याची जिद्द होती...

डॉक्टरांची शर्थ अन गंगाधर बडेंच्या आत्मविश्वासाने कोरोनाच हरला, रक्तातही विषाणूंचा झाला होता अधिक प्रसार

दत्ता देशमुख

बीड: कोरोना विषाणूचा हाहाकार (spread of covid 19), कोरोनामुळे मृत्यू, स्कोअर दहाच्या पुढे (HRCT score) आणि ऑक्सिजन लेव्हल ९० च्या आत आली की जणू काही सगळे संपले असेच वातावरण, चर्चा आणि त्यामुळे सर्वत्र भितीचे निर्माण झालेले सावट. पण, यातही दिलासादायक आणि आत्मविश्वास निर्माण करणारी घटना समोर आली आहे. वय ९८ पूर्ण, एचआरसीटी स्कोअर १८, रक्तात कोरोना विषाणूचा प्रसार अधिक झालेला, ऑक्सिजन लेव्हल ७० च्या घरात अशा गंभीर परिस्थितीतून स्वारातीच्या डॉक्टरांची शर्थ, रुग्णाचा आत्मविश्वास, उपचाराला प्रतिसादामुळे गंगधार नारायण बडे (वय ९८ पूर्ण, रा. चोपानवाडी, ता. अंबाजोगाई) यांनी कोरोनाला (covid 19 infection) लोळवण्यात यश मिळविले.

शेतकरी गंगाधर बडे यांना आयुष्यात तिसऱ्यांदा दवाखान्याची पायरी चढावी लागली. दोनदा अपघातामुळे आणि आता कोरोनाच्या संसर्गामुळे. पण, तिनही घटनांत त्यांचाच विजय झाला हे विशेष. गंगाधर बडे यांचा मुलगा श्रीधर बडेंना संसर्ग झाल्याने त्यांना दवाखान्यात दाखल केले. २१ एप्रिलला त्यांचीही चाचणी पॉझिटीव्ह आली. परिचारिका असलेला त्यांचा नातू रतन व नातसुन प्रियंका दोघांनीही तपासण्या करुन घरीच त्यांच्यावर उपचार सुरु केले. तेव्हा त्यांचा एचआरसीटी स्कोअर शुन्य होता. पण, त्यांचा ताप कमी होत नसल्याने आणि ऑक्सिजन लेव्हल कमी होत असल्याने त्यांना लोखंडीच्या जम्बो कोविड रुग्णालयात दाखल केले. यावेळी त्यांच्या सीटी स्कॅनचा स्कोअर नऊ आला आणि त्यांचा ताप वाढून त्यांची ऑक्सिजन लेव्हल हळुहळु कमी होऊ लागली. त्यामुळे त्यांना २६ एप्रिलला अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड रुग्णालयातील पाच क्रमांकाच्या वार्डमध्ये दाखल करण्यात आले.

त्यांच्या पुन्हा सर्व तपासण्या केल्या असता सीटी स्कॅन स्कोअर १८, तर रक्तांच्या तपासण्यात (एलडीएच, सीआरपी, आयएल ६) रक्तात संक्रमण अधिक झाल्याचे निष्पन्न झाले. त्यांची ऑक्सिजन लेव्हल देखील घसरुन ७० च्या घरात आली होती. डॉक्टरांपुढेही आव्हान होते. पण, स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयातील मेडीसीन विभागाच्या सिनीअर रेसीडन्स डॉ. इरा ढमढेरे व डॉ. प्रविण चेढे या दोघांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि अखेर गंगाधररावांना कोरोनामुक्त करण्यात यश मिळविले. त्यांना मेडिसीन विभागाचे प्रमुख डॉ. सिद्धेश्वर बिराजदार, सहयोगी प्राध्यापक डॉ. सचिन चौधरी, डॉ. विशाल लेडे यांचे मार्गदर्शन होतेच.

आत्मविश्वास व प्रतिसादही ठरला महत्वाचा

उपचार करणाऱ्या डॉ. इरा ढमढेरे म्हणतात त्यांना सहा रेमडेसिव्हीरच्या डोससह संपूर्ण उत्तम व आवश्यक औषधी दिली. पण, त्यांचा आत्मविश्वास आणि उपचाराला प्रतिसाद महत्वाचा ठरला. ऑक्सीजन कमी असल्यामुळे पालथे झोपणे, आहार वेळेवर घेणे, ऑक्सीजन मास्क निघू न देणे या बाबी त्यांनी कटाक्षाने पाळल्या. त्यांच्यासोबत काळजी घेण्यासाठी असलेली त्यांची ६५ वर्षीय मुलगी कांताबाई कराड यांचे सहकार्य देखील महत्वाचे ठरले. कांताबाई देखील संसर्गबाधीत असताना त्यांनी वडिलांची संपूर्ण काळजी घेतली. म्हणूनच त्यांना बुधवारी डिर्स्चार्जनंतर ना स्ट्रेचर लागले ना व्हिलचेअर. ते स्वत: काठी टेकवत दवाखान्याबाहेर चालत आले.

वेळेवर दवाखान्यात या, घाबरु नका-

गंगाधर बडे यांच्यासारखे वृद्ध आणि क्रिटीकल कंडीशनमधील रुग्ण बरे होतात. त्यामुळे वेळेत निदान करणे, लवकर दवाखान्यात येणे आणि घाबरुन न जाणे हा कोरोनाला हरविण्याचा सोपा मार्ग आहे.

- डॉ. इरा ढमढेरे, सिनीअर रेसीडन्स, मेडिसीन, स्वाराती, अंबाजोगाई.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

ENG vs IND, 2nd Test: रवींद्र जडेजानं मोडला BCCI चा 'हा' नियम; आता काय होणार कारवाई नेमक काय घडलं, वाचा!

Latest Maharashtra News Updates : पेशवे बाजीरावांच्या स्मारकासाठी सर्वात योग्य जागा म्हणजे NDA - गृहमंत्री अमित शाह

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

SCROLL FOR NEXT