file photo 
मराठवाडा

परभणी शहरातील चार वीजग्राहकांची दीड लाखाची वीजचोरी उघड

गणेश पांडे

परभणी : वीजचोरीला आळा बसावा यासाठी महावितरण तर्फे अनेक उपाय योजण्यात येत आहेत. त्यानुसार सध्या परभणी शहरात नवीन रेडिओ फ्रिक्वेंसी वर आधारीत अत्याधुनिक ईलेक्ट्रॉनिक मीटर बसविण्यात येत आहेत. परंतु, या मीटर मधेही फेरफार करून वीजचोरी करणाऱ्या परभणी शहरातील चार वीज ग्राहकांची वीजचोरी रेडिओ फ्रिक्वेंसी डेटा कॉन्सेट्रेटर युनिटद्वारे (डीसीयू) उघडकीस आली आहे. तब्बल १ लाख ५१ हजार ४४९ रूपयांची वीज चोरी उघड झाली असून वीज कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

या रेडिओ फ्रिक्वेंसी डेटा कॉन्सेट्रेटर प्रणालीद्वारे होणाऱ्या मीटर वाचनामुळे एखादा ग्राहक वीज चोरी करीत असेल तर त्याची माहिती केंद्रीय सर्व्हर मधून मिळते. त्यामुळे ग्राहकांकडून होणाऱ्या वीज चोरीस आळा बसण्यास मदत होणार आहे. या प्रणालीद्वारे ग्राहकांच्या मीटर रीडिंगची माहिती येण्यास सुरवात झाली असून परभणी शहरामधील चार वीजग्राहकांनी मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी करण्याचा प्रयत्न केला असता त्याची माहिती केंद्रीय बिलींग प्रणाली मध्ये उपलब्ध झाल्याने त्याग्राहकांची प्रत्यक्ष वीजचोरी पकडण्यात आली आहे.

परभणी मंडळाचे अधीक्षक अभियंता प्रविण अन्नछत्रे यांच्या निर्देशानुसार अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रमोद क्षीरसागर यांच्यासह जनमित्रांच्या चमूने आज (ता.23) रोजी परभणी शहरातील माळी गल्लीतील विद्युत ग्राहकांच्या मीटरची तपासणी केली असता ४ मीटरमधे  अनधिकृतपणे फेरफार करून वीज चोरी होत आसल्याचे निष्पन्न झाले. मागील सात ते आठ महिण्यापासून परभणी शहरात आरएफ मीटर व डीसीयु युनीट बसवण्याचे काम चालू आहे. आजतागायत शहरात जवळपास ४५ हजार आरएफ मीटर्स बसवण्यात आले आहेत. उर्वरीत ११ हजार मीटर्स बदलणे बाकी असून ते येणाऱ्या पंधरा दिवसात बदलण्यात येतील. डीसीयू युनीटव्दारे सदरील टँपर डाटा वरून कोणत्या मीटरमध्ये फेरफार केला आहे याची माहिती उपलब्ध होत आहे.

सदरील माहितीच्या आधारे आज ९ ग्राहकांच्या मीटरची तपासणी अँक्क्युचेकद्वारे करण्यात आली असता त्यात ४ ग्राहकांच्या मीटरमध्ये अनधिकृतपणे मीटरला छेडछाड करून मीटरची गती मंद करून १० हजार ७००  युनिट वीज चोरी करत झाल्याचे आढळून आले. चार ग्राहकांचे स्थळ पंचनामे करण्यात आले असून संबंधीतावर भारतीय विद्युत कायदा २००३ चे कलम १३५ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. आजच्या एकूण ४ वीज चोरी प्रकरणात १ लाख ५१ हजार ४४९ रूपयांची वीजचोरी झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

रेडिओ फ्रिक्वेंसी डेटाकॉन्सेट्रेटर युनिट ही प्रणाली मानव विरहित असून या प्रणाली द्वारे ग्राहकांचे अचूक मीटर वाचन नोंदविले जात आहे. त्यामुळे ग्राहकांची वीज बिलांबाबत कोणतीही तक्रार राहणार नाही.  या प्रणाली द्वारे प्रत्येक ग्राहकांचे मीटर रीडिंग उपलब्ध होत असून दर १५ मिनिटांमध्ये ग्राहक किती विजेचा वापर करीत आहे ते (real time) बघता येईल. तसेच त्या भागात वीज पुरवठा करणाऱ्या रोहित्रावर त्यावेळी किती वीजभार आहे, याची अचूक माहिती देखील या प्रणालीमुळे मिळणार आहे. त्यामुळे वीज ग्राहकांनी अधीकृतपणेच वीज वापर करावा अन्यथा मीटरमध्ये छेडछाड केल्याचे आढळल्यास वीज कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशारा महावितरणने दिला आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: पाकिस्तान UAE ला पराभूत करत 'सुपर फोर'मध्ये! भारताविरुद्ध पुन्हा होणार सामना, पण कधी अन् केव्हा? जाणून घ्या

Athletics Championship 2025: नीरज चोप्रा विरुद्ध अर्शद नदीम लढत होणार! जाणून घ्या कुठे अन् किती वाजता पाहाता येणार फायनल

PAK vs UAE: पाकिस्तानी विकेटकिपरच्या थ्रोमुळे अंपायरला मोठी दुखापत, मैदानंच सोडावं लागलं; जाणून घ्या नेमकं काय घडलं

Meenatai Thackeray statue case Update: मोठी बातमी! मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्यास २४ तासांच्या आत अटक; गुन्हाही केला कबूल

Disha Patani’s house firing incident: दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन शूटर्सचा अखेर गाझियाबादमध्ये खात्मा!

SCROLL FOR NEXT