संग्रहित छायाचित्र 
मराठवाडा

बीड जिल्ह्यात टॅंकर-दुचाकीच्या धडकेत  एक ठार 

सकाळ वृत्तसेवा

पाटोदा (जि. बीड) - पाटोदा तालुक्‍यातील गारमाथा येथे शुक्रवारी (ता. तीन) सकाळी टॅंकर आणि मोटारसायकलच्या अपघातात एका जणाचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला असून जखमींना बीड येथे रुग्णालयात हलवण्यात आले आहे. 

याबाबत माहिती अशी की, उद्धव विठ्ठल कुटे (वय 44, रा. वंजारवाडी) आणि प्रभू दादा बडे हे दोघे रायमोहावरून पाटोदाकडे जात असताना गारमाथा येथील चौकात नगर-बीड रस्ता ओलांडत असताना नगरकडून बीडकडे राख घेऊन जाणाऱ्या एका टॅंकरने कुटे यांच्या दुचाकीला धडक दिली.

यामध्ये उद्धव कुटे यांचा जागीच मृत्यू झाला, तर बडे हे गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून जखमींना उपचारासाठी बीड येथे हलवण्यात आले आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Citizenship: जन्मसिद्ध नागरिकत्वावर ट्रम्प यांचा डाव फसला! आदेशाला अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा ब्रेक; बर्थराइट सिटिझनशिप कायम

भाजपात अंतर्गत कुरघोडीचे राजकारण? नवनियुक्त शहराध्यक्षांच्या नियुक्तीला २४ तासांतच स्थगिती, नेमकं काय घडतंय?

Balen Shah News: नेपाळमध्ये नवा राजकीय वाद! बालेन शाहांच्या पक्षात ३५ हजार अल्पवयीन सदस्य? अडचणीत वाढ होणार

IND vs ENG 1st T20I: इंग्लंडने पहिला डाव टाकला; खचलेल्या टीम इंडियाला टक्कर देणारी प्लेइंग XI जाहीर; जोफ्रा नसला तरी...

Arabian Sea Monsoon : अरबी समुद्रात मॉन्सून तीव्र; ३ ते ६ जुलैदरम्यान मुंबई-उत्तर कोकणात अतिमुसळधार पाऊस, विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT