file photo 
मराठवाडा

देऊळवाडी येथे दोन गटात हाणामारीत एकाचा मृत्यू : तीन गंभीर

युवराज धोतरे

उदगीर (जि. लातूर) : देऊळवाडी ता उदगिर येथील शिवारात शनिवारी ता दोन सकाळी दोन गटात म्हणजे सख्ख्या चुलत भावा मध्ये झालेल्या हाणामारीत एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत वाढवणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब  नरवटे यांनी दिलेली माहिती अशी की शनिवारी (ता.2) सकाळी नऊ ते दहाच्या दरम्यान तळ्यातील माती काढण्याच्या कारणावरून दोन गटात हाणामारी झाली.यात एका गंभीर जखमीचा लातूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला असून उर्वरित जखमींवर येथील धन्वंतरी आयुर्वेद मेडिकल महाविद्यालयाच्या सामान्य रुग्णालयात (शासकीय) उपचार सुरू आहेत.

यातील मयत रुद्रप्पा बालाजी गताटे (वय-29) यार येथील सामान्य रुग्णालयात जखमी अवस्थेत दाखल करण्यात आले होते दुपारी येथून त्यास लातूरला हलवण्यात आले होते लातूर येथे उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.
मयताच्या बाजूकडील बालाजी गताटे, संगमेश गताटे, सतीश गताटे, दत्ता गताटे हे गंभीर जखमी असून ते सध्या सामान्य रूग्णालयात उपचार घेत आहेत तर आरोपीच्या बाजूकडून राहुल गताटे, सुरज गताटे हे किरकोळ जखमी झाले आहेत. याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

या दोन गटांमध्ये शेतीच्या वादातून हाणामारी झाली असून काठी कुराड या हत्याराने मारहाण झाली आहे यातील मयताची प्रकृती येथील धन्वंतरी आयुर्वेद मेडिकल महाविद्यालयात दाखल असताना दुपारपर्यंत स्टेबल होती परंतु अचानक खालावत चालल्याने त्यास लातूरला हलवण्यात आले होते लातूर येथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती साहाय्यक पोलीस निरीक्षक श्री नरवटे यांनी सांगितले.

चुलत भाऊ बनले वैरी...
या हाणामारीत दोन्ही गटाचे नागरिक हे चुलत भाऊ आहेत. चुलत भाऊ असतानाही यांनी हानामारी केली असून चुलत भाऊ पक्के वैरी बनले असल्याचे समोर आले आहे. भाऊ असूनही किरकोळ हाणामारी न करता गंभीर हाणामारी करून घेतल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain : महाराष्ट्रातून पाऊस गायब होणार? मोठ्या पावसाचा इशारा नाही

भारताला LPG पुरवठा करणारा अमेरिका ठरला सर्वात मोठा देश; US अधिकारी म्हणाल्या, ‘एनर्जी सप्लायर बनल्याचा आनंद’

Pune University : पुणे विद्यापीठाचा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! भोजनगृहाची दरवाढ रद्द, दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

SCROLL FOR NEXT