tree 
मराठवाडा

वृक्षलागवडीला एक वर्ष ; व्हॉट्सअप ग्रुपने जगविली पंधराशे झाडे  

राजेश दारव्हेकर

हिंगोली ः ‘एक मुल, तीस झाड’ या उपक्रमातून लागवड केलेल्या वृक्षाच्या रोपट्यांची सोमवारी (ता.२५) वर्षपुर्ती झाली असून दीड हजार वृक्षांची जोपासना व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून करण्यात आली असून यामुळे उन्हाळ्यात देखील गावात हिरवळ दिसत आहे. 

वरुडचक्रपान (ता.सेनगाव) येथे  मागच्या एक वर्षापुर्वी अण्णा जगताप व चंद्रकांत कावरखे यांनी वृक्ष लागवड वरूड नगरी या व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून व त्‍यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्ष लागवड करण्यात आली. सुरुवातीला श्री. जगताप यांनी ‘एक मुल, तीस झाड’ या उपक्रमानुसार तरुण मुलांना भावी पिढीसाठी शेतकरी आर्थिकदृष्ट्या कसा प्रबळ होईल हे जाणून दिले. आणि पहिल्या दिवशी पाच झाडे लावून २६ मे २०१९ ला वृक्षलागवडीचा श्रीगणेशा केला. त्‍याला एक वर्षपुर्ण झाले. यामुळे झाड लावण्याची क्षमता वाढत गेली. 

ग्रामपंचायतीसह अनेकांचा हातभार 
यात ग्रामपंचायतीने यासाठी एमआरजीएस मंजूर करून दिले. आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी अडीच लाख रुपयांच्या ट्रिगार्ड झाडांना लावण्यासाठी उपलब्ध करून दिले आणि गावातील लोकांनी जवळपास तीन लाख रुपयांपर्यंत नगदी रक्कम यासाठी उपलब्ध झाली. तसेच दिपक भारूका यांनी नुकतीच ५० हजारांची देणगी यासाठी दिली. यासाठी अमोल मगर, सोपान मगर यांच्या पुढाकारातून हा उपक्रम वर्षभर राबविण्यात आला. 

पंधराशे झाडे जगली
गावात आता ही चळवळ तयार झाली. मुलांच्या भविष्यासाठी आपल्या शेतात फळांच्या उत्पादनाचे  एक मुल आणि ३० फळ झाड लावायचे आणि दोन मुल असले की ६० झाड लावण्यासाठी सर्वांना परावृत करण्यात येत आहे. आज या उपक्रमातून येथे पंधराशे झाडे जगली आहेत. त्‍यासाठी पाण्याचीदेखील व्यवस्‍था करण्यात आली. टँकरद्वारे या झाडांना पाणी दिले जात आहे. यात युवकांचे गट तयार करून त्‍याना वेळापत्रक तयार करून दिले. यातून या मुलांनी वृक्षांना नियमित पाणी दिले. 

गावाचा परिसर हिरवळीने नटला
वरूड येथुन जाणाऱ्या सेनगाव, भानखेडा व कौठा जाणाऱ्या या तीन रस्‍त्‍यासह गावात जाणारा रस्‍ता व स्‍मशानभुमीत वृक्षाची लागवड केली. यासाठी गावातील मुलांच्या एका टिमने यात हिरीरीने सहभाग घेवून झोकून दिले. त्‍यांच्या टिमला जंगल के लुटेरे असे नाव देण्यात आले होते. यासह मंत्रालयात सचिव म्‍हणून कार्यरत असलेले महेश वरुडकर तसेच सोपान मगर यांचादेखील महत्‍वाचा सहभाग होता. या सर्वांच्या मदतीने वड, पिंपळ, चिंच, करंज, जांभुळ अशी दिर्घायुषी झाडे येथे लावण्यात आली. यामुळे गावासह गावाचा परिसर हिरवळीने नटला आहे. 

पुढे देखील उपक्रम सुरूच राहणार
मागच्या वर्षी अण्णा जगताप यांच्या सहकार्याने गावात एक मुल, तीस झाडे हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला. त्‍यासाठी युवकांच्या बैठका घेवून त्‍यांना त्‍याचे महत्‍व पटवून देण्यात आले. त्‍यानंतर गावात ही चळवळ सुरू झाली व दीड हजार झाडे लावून त्‍याची जोपासणी केली ती सर्व झाडे जगली आहेत. या झाडांना एक वर्षपुर्ण झाले. आता पुढे देखील ही सुरूच राहणार आहे. 
- भिमाशंकर मगर.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 2nd Test: भारताला विजयाची संधी, पण पाऊस थांबणार कधी? शेवटच्या दिवशी खेळ झाला नाही तर काय, जाणून घ्या

'पुन्हा तोच बसस्टॉप' तेजश्री दिसणार जुन्या स्टॉपवर, फोटो शेअर करत म्हणाली, 'तेच ठाणे, तेच ठिकाण आणि तेच तुम्ही..'

Manmad News : मनमाड बाजार समितीच्या अडचणींवर मुख्यमंत्री फडणवीसांचा ‘सर्जिकल स्ट्राइक

Crime: मुंबईत धक्कादायक प्रकार! आधी गळा दाबून मारलं, नंतर ग्रॅनाइट मशीनने पत्नीचा शिरच्छेद अन्...; विक्षिप्त पतीचं कृत्य

'मला मराठी येत नाही, हिंमत असेल तर हकलून दाखवा' प्रसिद्ध अभिनेत्याचं ठाकरे बंधूंना चॅलेंज, म्हणाला, 'भाषेच्या नावावर हिंसा...'

SCROLL FOR NEXT