crime
crime 
मराठवाडा

अवघ्या दोन तासात संशयित गुन्हे शाखेच्या ताब्यात

उमेश वाघमारे

जालना : शहरातील कुंडलीका नदीच्या काठावर असलेल्या एका मंदिर परिसरात तरुणाचा खून झाल्याची घटना गुरुवारी (ता.25) सकाळी 11 वाजता उघडकिस आली.  कुमार शरदचंद्र झुंनजुर (वय 28 रा. लक्ष्मीनारायण पूरा) असे मयतांचे नाव आहे.

दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेने तपासाचे चक्र फिरवित अवघ्या दोन तासात संशयितास  अटक केली आहे. विजय तुळशिराम मुंगसे ( वय 30) असे संशयित आरोपीचे नाव आहे. पैशांच्या वादतुन हा खून झाल्याच तपासात उघड झालं आहे.

शहरातील सिद्धि विनायकनगरच्या पाठिमागे मल्लावं समाजाचे तुळजाभवानी मातेचे मंदिर आहे. हा भाग  तसा अडगळीचा आहे. याच मंदिराच्या आवारात  गुरुवारी (ता.25) सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास एक तरुणाच्या पोटात चाकू खुपसुन खून झाल्याचे घटना उघडकिस आली. पोलिसांनी मृतदेहाची तपासणी केल्यानंतर पॅनकार्डवरुन हा मृतदेह कुमार शरदचंद्र झुंनजुर (वय 28 रा. लक्ष्मीनारायण पूरा) याचा असल्याचे उघडकिस आले.  मयत कुमार झुंनजुन याच्या पोटात चाकूचे पाच ते सहा वार केल्यानंतर पोटात खुपसलेला चाकू तसेच होता. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर प्रथम स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर हे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले होते.  त्यानंतर  पोलिस उपअधिक्षक (गृह) अभय देशपांडे, उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल गायकवाड, कदीम जालना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय लोहकरे यांच्यासह  फिंगर प्रिंट, श्वास पथक घटनास्थळी दाखल झाले होते. 

दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांनी तपासाचे चक्र फिरवित संशयित आरोपी विजय तुळशिराम मुंगसे (वय 30) याला अवघ्या दोन तासात ताब्यात घेतले आहे. विजय मुंगसे याने व्याजाने घेतलेले एक लाख रुपये कुमार झुनजुन याच्याकडे ठेवण्यासाठी दिले होते. मात्र ठेवण्यासाठी दिलेले पैसे मागितल्यानंतर कुमार झुंनजुन याने पैसे हरवल्याचे सांगितले. या पैशावरुन झालेल्या वादातुन हा खून  केल्याची  काबुली संशयित आरोपी विजय मुंगसे यानी दिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: अजित पवार अन् शरद पवार लग्न सोहळ्यानिमित्त एकत्र

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : राजस्थान क्वालिफाय करणार की हैदराबाद मजबूत स्थितीत पोहचणार?

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

PPF : दररोज 250 रुपये वाचवून तयार होईल 24 लाखांचा फंड, कसा ते वाचा ?

SCROLL FOR NEXT