Latur Latest News 
मराठवाडा

सार्वजनिक, धार्मिक व अन्य कार्यक्रमांसाठी केवळ ५० लोक उपस्थित राहू शकतात, मर्यादा ओलांडल्यास कारवाई

विकास गाढवे

लातूर : जिल्ह्यातील वाढता कोरोनाचा प्रसार राखण्यासाठी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी सार्वजनिक, धार्मिक व अन्य कार्यक्रमांतील लोकांच्या उपस्थितींवर मर्यादा आणल्या आहेत. केवळ ५० लोकांच्या उपस्थितीत हे कार्यक्रम पार पाडावे लागणार आहेत. मर्यादेपेक्षा जास्त व्यक्तींची उपस्थिती आढळून आल्यास कारवाई करण्यात येणार आहे, असे आदेश पृथ्वीराज यांनी दिल्याने येत्या काळात होणाऱ्या लग्न व धार्मिक कार्यक्रम साधेपणाने साजरे करावे लागणार आहेत.


कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर सार्वजनिक व अन्य कार्यक्रमांतील उपस्थितींवरील बंधने हटवण्यात आली होती. मात्र, मागील काही दिवसांत कोरोनाचा प्रसार वाढला असताना विविध कार्यक्रमांना लोकांची गर्दी वाढली आहे. कार्यक्रमांतील गर्दीला आवर घालण्यासाठी जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांनी बुधवारी (ता. तीन) आपत्ती व्यवस्थापन तसेच साथरोग प्रतिबंधक कायदा व अन्य तरतुदीनुसार आदेश काढले आहेत. त्यानुसार विविध सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय व इतर कार्यक्रमांतील लोकांच्या उपस्थितीवर मर्यादा आणल्या आहेत. यापुढील काळात केवळ ५० लोकांच्या उपस्थितीत हे कार्यक्रम साजरे करण्याचे बंधन जिल्हाधिकाऱ्यांनी घातले आहे.

सार्वजनिक स्वरुपाचे तसेच धार्मिक कार्यक्रम रूढी व परंपरेनुसार पार पाडण्यास परवानगी देण्यात आली. असे असले तरी केवळ आवश्यक विधीसाठीही ५० लोकांचीच उपस्थिती बंधनकारक केली आहे. कार्यक्रमाला पन्नासपेक्षा जास्त लोक उपस्थित असल्याचे आढळून आल्यास संबंधितांविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांनी दिला आहे. साथरोग प्रतिबंधक कायदा, भारतीय दंड संहिता, आपत्ती व्यवस्थापन कायदा, फौजदारी प्रक्रिया संहिता व महाराष्ट्र कोव्हीड-१९ उपाययोजना नियमातील तरतुदीनुसार ही कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

समृद्धी महामार्गावर दुचाकींचा धोकादायक सुसाट प्रवास; प्रवेशबंदी धाब्यावर, व्हिडिओ व्हायरल

Bullock Cart Race Accident : बैलांच्या पायात अडकला तरुण, बैलगाडीखाली चिरडले जाताना सुदैवाने बचावले; शर्यतीत दुचाकीस्वारांचा थरकाप उडवणारा अपघात

कथानकातील ढिसाळपणा पडला भारी ! ठरलं तर मगचा टीआरपी घसरला, स्टार प्रवाहची 'ही' मालिका ठरली गेमचेंजर

Horoscope : उद्या बनतोय संकष्टी लाभ योग! पुढचे तीन दिवस 'या' 3 राशींसाठी गोल्डन टाइम; पैशाची अडचण होईल दूर, अडकलेल्या कामांची पूर्ती

Satara ZP Politics : साताऱ्यात झेडपी सभापती निवडीवर राष्ट्रवादी-शिवसेनेचा बहिष्कार; शंभूराज देसाई-मकरंद पाटलांचा 'मास्टरस्ट्रोक', पण भाजपचा मार्ग झाला मोकळा

SCROLL FOR NEXT