latur
latur sakal
मराठवाडा

Latur News : लातूरला राज्यस्तरीय निमाकॉन परिषदेचे उद्‍घाटन ; नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनचा उपक्रम

सकाळ वृत्तसेवा

लातूर : येथे नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनच्या (निमा) लातूर शाखेच्या वतीने शनिवारी (ता.२०) दोनदिवसीय निमाकॅान अॅण्ड हेल्थ एक्स्पो २०२४ या राज्यस्तरीय परिषदेचे उद््घाटन आमदार अभिमन्यू पवार यांच्या हस्ते झाले.

अध्यक्षस्थानी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष डॉ. आशुतोष कुलकर्णी होते. डॉ. अश्विन वळसंगकर (सोलापूर), केंद्रीय कोषाध्यक्ष डॉ. शांतीलाल शर्मा, राज्याचे अध्यक्ष डॉ. तुषार सूर्यवंशी, सचिव डॉ. मोहन येंडे, डॉ. विनायक टेंभुर्णीकर, उपाध्यक्ष डॉ. गजानन पडघन, डॉ. शैलेश निकम, डॉ. अनुश्रीमुंडेवाडी, डॉ. वैशाली पडघन, लातूर शाखेचे अध्यक्ष डॉ. मनोज देशमुख, सचिव डॉ. महेश सांडूर, डॉ. महेश कदम आदी उपस्थित होते.

यावेळी डॉ. सी. एन. जोशी, डॉ. एस. जे.कडतने, डॉ. आर. के. पाटील, डॉ. व्ही. एम. वांजरखेडकर व डॉ. ए. जी. जोशी यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. आयुर्वेद ही प्राचीन चिकित्सापद्धती आहे. प्रत्येक जिल्ह्यात आयुष रुग्णालय होत आहेत. या संघटनेच्या काही मागण्या आहेत.

त्या सोडवण्यासाठी सरकार दरबारी आपण वकिली करू, अशी ग्वाही आमदार पवार यांनी यावेळी दिली. लातूर शाखेचे अध्यक्ष डॉ. मनोज देशमुख यांनी प्रास्ताविक केले. तर आभार डॉ. महेश सांडूर यांनी मानले. रविवारी या परिषदेचा समारोप होणार आहे. या परिषदेकरिता डॉ. संजय जोशी, डॉ. विनोद कोराळे, डॉ. प्रमोद हातागळे, डॉ. दयानंद मोटेगावकर, डॅा. सुरेखा कलशेट्टी, डॅा. संगीता जिरे आदींनी पुढाकार घेतला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अभिनेते अमिताभ बच्चन यांनी बजावला मतदानाचा हक्क

Paresh Rawal: "मतदान न करणाऱ्यांचे टॅक्स वाढवा.."; परेश रावल यांनी केली शिक्षेची मागणी

RCB vs CSK: चेन्नईला पराभूत झालेलं पाहताच दिग्गज क्रिकेटरचे पाणावले डोळे, Video होतोय व्हायरल

Latest Marathi Live News Update: ऑटोरिक्षा अपघातात जखमी झालेल्या महिलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली मदत

Apple News : ॲपल कंपनीने नाकारले १७ लाख ऍप ; जाणून घ्या काय आहे प्रकरण

SCROLL FOR NEXT