corona.jpg
corona.jpg 
मराठवाडा

उस्मानाबाद : कारागृहातील १७, माळी गल्लीतील ७ जणांना कोरोना, सध्या १५१ रुग्णांवर उपचार

तानाजी जाधवर

उस्मानाबाद : जिल्ह्यात अजून ३३ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. रात्री उशीरा प्राप्त झालेल्या या अहवालात शहरातील माळी गल्ली येथील सात रुग्णांचा समावेश आहे. याशिवाय रॅपिड अँटीजेन टेस्ट किट्स उपलब्ध झाल्यामुळे त्या माध्यमातून कारागृह उस्मानाबाद येथील ५८ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली. त्यापैकी १७ जणाचे अहवाल  पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्याच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे.  

जिल्हा शासकीय रुग्णालय येथून (ता.१२) रोजी स्वॅब नमुने विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथे पाठविण्यात आलेले होते. त्यातील अनेक नमुने प्रलंबित होते. त्याचे अहवाल रात्री उशीरा प्राप्त झाले आहेत. त्यातील ९८ अहवाल आले असुन त्यामध्ये १३ पॉझिटीव्ह आहेत. पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये उस्मानाबाद तालुक्यातील सात जणाचा समावेश आहे.

८० वर्षीय पुरुष, १० वर्षीय मुलगा, ३८ वर्षीय, १४ वर्षीय मुलगी, ५३ वर्षीय महिला, ३५ वर्षीय पुरुष, २५ वर्षीय पुरुष हे सातही जण उस्मानाबाद शहरातील माळी गल्ली येथील आहेत. वाशी तालुक्यातील तीन रुग्णामध्ये ७१ वर्षीय पुरुष (रा. तेरखेडा), २० वर्षीय पुरुष ( रा.पार्डी), १८ वर्षीय पुरुष (रा. पार्डी), तुळजापूर तालुक्यातील तीन रुग्णामध्ये २९ वर्षीय पुरुष (रा सावरगाव), ४५ वर्षीय महिला (रा. सावरगाव), ५३ वर्षीय पुरुष तुळजापूर शहरातील आहेत. 

सोमवारी बाहेर जिल्ह्यात पॉजिटीव्ह आलेल्या व तेथेच उपचार घेत असलेले तीन रुग्णाचा समावेश आहे. त्यामध्ये ३५ वर्षीय पुरुष (रा. भूम) ते सोलापूर येथे उपचार घेत आहेत. ५० वर्षीय पुरुष (रा. परांडा) ते सुध्दा सोलापूर येथे उपचार घेत आहेत. ५३ वर्षीय पुरुष बार्शीमध्ये उपचार घेत आहेत.

पालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले  

सोमवारी (ता. १३) जिल्ह रुग्णालय उस्मानाबाद येथे रॅपिड अँटीजेन टेस्ट किट्स उपलब्ध झाल्या आहेत. त्या माध्यमातून तात्पुरते कारागृह उस्मानाबाद येथील ५८ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली, त्यापैकी १७ जण पॉजिटीव्ह आले आहेत.त्यामध्ये सहा कारागृह कर्मचाऱ्यांचे समावेश आहे. ११ कारागृहातील बंदी आहेत. त्यामुळे जिल्ह्यात एकूण ३३ रुग्णांची बाधितांमध्ये भर पडली आहे. 

कोरोना मीटर 

  • एकूण रुग्णांची संख्या - ४१८ 
  • डिस्चार्ज झालेल्या रुग्णाची संख्या - २५० 
  • मृत्यु झालेल्या - १७ 
  • सध्या उपचार सूरु रुग्णावर - १५१

संपादन : प्रताप अवचार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT