corona death.jpg
corona death.jpg 
मराठवाडा

Corona : उस्मानाबादेत बारा तासांत चार बळी; २०४ पॉझिटिव्हची भर, आता २,०६७ रुग्णांवर उपचार सुरु 

तानाजी जाधवर

उस्मानाबाद : जिल्ह्यामध्ये बुधवारी २०४ कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे. तर मागील बारा तासात चार जणांचा मृत्यु झाला आहे. जिल्ह्यात आज दिवसभरात एकुण १८९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मृत्युमध्ये दोन महिला व दोन पुरुषाचा समावेश आहे. बुधवारी आलेल्या रुग्णामध्ये १०९ जणांची टेस्ट आरटीपीसीआर मधुन पॉझिटिव्ह आली. तर ८१ रुग्णांची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. 

जिल्ह्याचा विचार करता उस्मानाबाद तालुक्यामध्ये ७२, तुळजापुर ३२, उमरगा २८, कळंब ४१, परंडा १५, लोहारा सहा, भुम आठ व वाशी दोन इतक्या रुग्णांची संख्या नव्याने वाढली आहे. जिल्ह्यामध्ये मृत्युचा दर आता २.७० टक्क्यावर गेला आहे. उस्मानाबादमध्ये आरटीपीसीआरमधुन पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाची माहिती पाहिली तर माणिक चौक एक, लेप्रसी ऑफीस एक, बार्शी रोड एक, अक्षय हॉस्पीटल एक, दत्त नगर एक तर तालुक्यामध्ये उत्तमी कायापुर एक, उंबरेगव्हाण नऊ, वडगाव (सि) एक, सांगवी एक याठिकाणी रुग्ण सापडले आहेत. तुळजापुर शहरात पाच तर तालुक्यामध्ये अपसिंगा ११, नांदुर्गा एक, जळकोट एक, होनाळा एक,कामठा तीन, वेताळ नगर एक, मुर्टा एक आदी ठिकाणी रुग्ण सापडले आहेत. 

कळंब शहरामध्ये दत्त नगर येथे १३, आंबेडकर चौक दोन, बाबा नगर एक, शिवशक्ती हॉस्पीटल एक, पोलीस ठाणे एक तर तालुक्यामध्ये शिराढोण एक, जवळा एक, पिंपळगाव डोळा दहा या ठिकाणी रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.  जिल्ह्यामध्ये ६११८ इतक्या रुग्णाची नोंद झाली आहे, त्यामधील ३८८६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या २०६७ इतकी आहे. जिल्ह्यातील एकुण मृत्युची संख्या १६७ वर पोहचली आहे.

मृत्यूत येथील रुग्णांचा समावेश 
उस्मानाबाद शहरातील गणेश नगर भागामधील ८५ वर्षीय स्त्रीचा कोरोनाने उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयात (ता. एक) रोजी मृत्यु झाला. कळंब तालुक्यातील जवळा येथील ७२ वर्षीय पुरुषाचा विलासराव देशमुख शासकीय रुग्णालय लातुर येथे उपचारादरम्यान मृत्यु झाला. उस्मानाबाद तालुक्यातील व़डगाव सिध्देश्वर येथील ६० वर्षीय पुरुषाचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. तसेच भुम तालुक्यातील गोलेगाव येथील ७० वर्षीय स्त्रीचा उस्मानाबाद जिल्हा रुग्मालयात मृत्यु झाला आहे.

(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जेपी नड्डा, अमित मालवीय यांना 'आक्षेपार्ह पोस्ट' प्रकरणी पोलिसांचे समन्स, काय आहे प्रकरण?

T20 Cricket: 12 धावात खेळ खल्लास! तब्बल 6 फलंदाज भोपळाही फोडला नाही; टी20 सामन्यात झाला अनोखा विक्रम

Sam Pitroda: पित्रोदांच्या विधानावरुन PM मोदींचं तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान; म्हणाले, युती...

SRH vs LSG Live Score : तिसऱ्या स्थानासाठी हैदराबाद अन् लखनौ भिडणार

पूंछमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचे फोटो समोर, पाकिस्तानशी थेट कनेक्शनची शक्यता

SCROLL FOR NEXT