उस्मानाबाद : ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झालेले वृत्त.  
मराठवाडा

‘त्या’ भावंडांना शिवसेनेकडून २५ हजारांची मदत

सकाळ वृत्तसेवा

उस्मानाबाद : ‘आमची आई देवाघरी गेली आहे. घरातील किराणा संपला आहे, आम्हालाही धान्य द्या ना...’ अशी मदतीची याचना करणाऱ्या शहरातील ‘त्या’ भावंडांना शिवसेनेकडून २५ हजार रुपयांची मदत रविवारी (ता. ११) देण्यात आली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पुढाकारातून आमदार कैलास पाटील, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्या उपस्थितीत ही मदत देण्यात आली. शुक्रवारी (ता. दहा) याबाबतचे वृत्त ‘सकाळ’ने प्रथम प्रसिद्ध केले. त्यानंतर ‘त्या’ भावंडांना मदतीचा ओघ सुरू झाला आहे.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा  

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे सर्वच पातळ्यांवर व्यवहार, उद्योग, कामे ठप्प झाली आहेत. त्यामुळे अनेकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरातील एका दिव्यांग भावंडांचा फोन नगरसेवक युवराज नळे यांना गुरुवारी (ता. नऊ) आला होता. ‘आमची आई देवाघरी गेली आहे. आम्ही घरात दोघेच असतोत. आमच्या घरातील धान्य, किराणा संपला आहे. आम्हालाही मदत कराना...’, अशी याचना या भावंडांनी नळे यांच्याकडे मांडली. त्याचवेळी नळे यांनी त्या भावंडांची अधिक माहिती जाणून घेतली. त्यानंतर प्रसाद राजेनिंबाळकर यांच्या कुटुंबीयांकडून त्या भावंडांना तत्काळ किराणा उपलब्ध करून दिला होता.

ती दोन्ही भावंडे दिव्यांग आहेत. भावाला काहीच समजून येत नाही. त्यांच्या आईला रक्तदाबाचा त्रास होता. दीड महिन्यापूर्वी आईने किराणा भरला होता. मात्र त्यानंतर काही दिवसांनी ती माऊली अकाली देवाघरी गेल्याने ही भावंडे निराधार झाली. याबाबतचे वृत्त ‘सकाळ’ने प्रसिद्ध केले.

या वृत्ताची दखल घेत, त्या भावंडांना मदतीचा ओघ सुरू झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार आमदार ज्ञानराज चौगुले यांनी पुढाकर घेत उस्मानाबाद शहरात येऊन त्या भावंडांना २५ हजार रुपयांची मदत देण्यात आली आहे. यावेळी आमदार कैलास घाटगे-पाटील, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, नगरसेवक युवराज नळे, ज्योती राजेनिंबाळकर आदी उपस्थित होते. याशिवाय काही संघटनांनी साहित्य, किराणाच्या माध्यमातून त्या भावंडांना मदतीचा हात पुढे केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : एरंडोलमध्ये ८२ सार्वजनिक गणेश मंडळांकडून उत्साहात गणरायाची स्थापना

पतीचा मंगळदोष दूर करण्यासाठी पत्नीच्या प्रायव्हेट पार्टला हळदी कुंकू लावून...; भोंदूबाबाकडून अघोरी कृत्य, हुंड्यासाठी छळ

Ganesh Chaturthi 2026: क्रिकेटपटूंचा ‘सुपर सिलेक्टर’ म्हणून प्रसिद्ध खजराना गणपती; दरवर्षी १ इंचाने वाढतो स्वयंभू मूर्तीचा आकार?

Ganesh Chaturthi 2026 : गणपतीचे जन्मस्थान कोणते माहितीय ? इथे कधीच होत नाही गणेश विसर्जन ! जाणून घ्या डोडीतालचे रहस्य

Asia Cup 2026 : 'त्यांच्याकडून आणखी काही मागू शकत नाही...', कर्णधार हरमनप्रीत कौरने चॅम्पियन झाल्यानंतर काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT