File photo 
मराठवाडा

ऐन पावसाळ्यात १५२ गावांना पाणीटंचाईच्या झळा

राजेंद्रकुमार जाधव

उस्मानाबाद : ऐन पावसाळ्याच्या तोंडावरच जिल्ह्यातील १५२ गावांना २३१ अधिग्रहणांद्वारे, तर १४ गावांना १४ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. मृग नक्षत्र सुरू होऊन दोन दिवस झाले तरी अद्यापही पावसाचा अंदाज नसल्यामुळे पाणीटंचाई जाणवणाऱ्या गावांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

यंदा एप्रिलअखेरपर्यंत जिल्ह्यातील गावांना पाणीटंचाई जाणवली नाही. मे महिना सुरू होताच काही गावांतील सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी, कूपनलिकांची पाणीपातळी खालावून अनेक ठिकाणच्या कूपनलिका कोरड्या पडत गेल्या. त्यामुळे अधिग्रहण किंवा टँकरने पाणीपुरवठा करण्याच्या मागणीचे प्रस्ताव प्रशासनाकडे दाखल करण्यास सुरवात झाली.

सध्या जिल्ह्यातील १४ गावांना १४ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये कोळेवाडी (ता. उस्मानाबाद), कलदेव निंबाळा (ता. उमरगा), ताडगाव (ता. कळंब), वालवड, दरेवाडी, आष्टावाडी (ता. भूम), कात्राबाद, खासगाव, वडनेर, टाकळी, ढगपिंपरी, मुगाव, रुई-दुधी, सरणवाडी या गावांना प्रत्येकी एका टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

यामध्ये कलदेव निंबाळा आणि वालवड येथे प्रत्येकी दोन टँकर सुरू असून, उर्वरित गावांना प्रत्येकी एका टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. या गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरमध्ये पाणी भरण्यासाठी १४ विहिरी व कूपनलिकांचे अधिग्रहण करण्यात आले आहे. या गावांतील २३ हजार ८९७ ग्रामस्थांची तहान टँकरच्या पाण्यावर भागवली जात आहे. 

जिल्ह्यातील १५२ गावांना २३१ अधिग्रहणांद्वारे सध्या पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तालुकानिहाय अधिग्रहणांची संख्या याप्रमाणे : उस्मानाबाद- ९६, तुळजापूर- १२, उमरगा- ३५, लोहारा- दोन, कळंब- ३५, भूम- १०, वाशी- आठ, परंडा- ३३. एकूण २३१ अधिग्रहणांद्वारे १५२ गावांना पाणीपुरवठा सुरू आहे. येत्या काही दिवसांत समाधानकारक पाऊस न झाल्यास पाणीटंचाई जाणवणाऱ्या गावांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

प्रकल्पांमध्ये सव्वासहाच टक्के पाणीसाठा 
जिल्ह्यात मोठा, मध्यम व लघुप्रकल्प २२३ आहेत. या सर्व प्रकल्पांमध्ये सध्या ६.२६ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामध्ये एकमेव असलेल्या मोठ्या प्रकल्पांत उपयुक्त पाणीसाठा शून्य टक्के आहे. १७ मध्यम प्रकल्पात ९.०४ टक्के तर २०५ लघुप्रकल्पांत ६.०६ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे.

३७ प्रकल्प कोरडे पडले असून, ९७ प्रकल्पांमध्ये जोत्याच्या खाली पाणीसाठा आहे. ६५ प्रकल्पांमध्ये २५ टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे. १४ प्रकल्पांमध्ये २५ ते ५० टक्के, दोन प्रकल्पांमध्ये ५१ ते ७५ टक्के तर एकाच लघुप्रकल्पांत शंभर टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. प्रकल्पांतील पाणीसाठ्यात वाढ होण्यासाठी आणि पाणीटंचाई दूर होण्यासाठी आता मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली! भामा आसखेड धरण निम्म्याहून अधिक फुल्ल; आकडेवारी समोर

Water Level: अडाण जलाशयाच्या पाणीसाठ्यात आठवड्याभरात चार टक्क्यांनी वाढ;४५.७५ टक्के जलसाठा

Latest Maharashtra News Live Updates: आषाढी एकादशी निमित्तानं कल्याण इथल्या बिर्ला महाविद्यालयात ज्ञान दिंडी सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सहभाग

Tanisha Kotecha : नाशिकच्या तनिषा कोटेचाचे आशियाई टेबल टेनिस स्पर्धेत शानदार यश

HPCL Recruitment 2025: हिंदुस्तान पेट्रोलियमकडून 2.80 लाख पगाराची नोकरी! 300 हून अधिक जागा; जाणून घ्या अर्ज कसा करावा

SCROLL FOR NEXT