कळंब : कोल्हापूरहून ट्रॅक्टरमधून सोनपेठकडे निघालेल्या मजुरांची जिल्हा परिषद शाळेतील तात्पुरत्या निवारागृहात करण्यात आलेली व्यवस्था. 
मराठवाडा

तीन ट्रॅक्टरमधून ५० ऊसतोड मजुरांना पकडले

दिलीप गंभिरे

कळंब (जि. उस्मानाबाद) : कोल्हापूरहून परभणी जिल्ह्यातील सोनपेठकडे जाणाऱ्या ५० ऊसतोडणी मजुरांना घेऊन निघालेले तीन ट्रॅक्टर पोलिसांनी रविवारी (ता. पाच) सात्रा फाटा (ता. कळंब) येथे पकडले. सर्व मजुरांची आरोग्य तपासणी करून त्यांची येथील येरमाळा रस्त्यावरील जिल्हा परिषदेच्या मुलांच्या शाळेतील तात्पुरत्या निवारागृहात सोय करण्यात आली आहे.

कोरोनामुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. साखर कारखाने बंद झाल्यामुळे ऊसतोडीसाठी गेलेल्या मजुरांची गैरसोय होत आहे. त्यांना गावाकडे जाण्यासाठी लॉकडाऊनमुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. ऊसतोडीसाठी कारखान्यांकडे असलेल्या मजुरांना सोडू नये, त्यांची व्यवस्था कारखाना परिसरातच करावी, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वारंवार सांगितले. तरीही मजुरांचे लोंढे गावाकडे मिळेल त्या वाहनाने निघत आहेत. 

सोनपेठ (जि. परभरणी) तालुक्यातील ऊसतोड मजूर कोल्हापूर येथील साखर कारखान्यांकडे ऊसतोडीसाठी गेले होते. हे सर्व मजूर तीन ट्रॅक्टरमधून कळंबमार्गे सोनपेठकडे निघाले होते. लॉकडाऊनमुळे पोलिस प्रशासन प्रत्येक वाहनांची कसून तपासणी करीत आहे. कळंब तालुक्यातील सात्रा फाटा येथे पोलिसांनी या मजुरांची वाहतूक करणारे ट्रॅक्टर रविवारी सकाळी पावणेअकराच्या सुमारास पकडले. त्यानंतर या ट्रॅक्टरमधील सर्व मजुरांची आरोग्य तपासणी करून त्यांची रवानगी जिल्हा परिषद शाळेतील तात्पुरत्या निवारागृहात केली.

तहसीलदार मंजूषा लटपटे यांनी तातडीने भेट देऊन त्यांच्या जेवण व राहण्याची सोय करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या. लहान मुलांची संख्या अधिक असल्याने त्यांना सकाळी दूध उपलब्ध करण्याची सूचनाही त्यांनी केली. 

पत्रकार संघाकडून कपडे वाटप 
गेल्या सहा दिवसांपासून या मजुरांचा ट्रॅकटरमधून सोनपेठकडे प्रवास सुरू आहे. त्यांना जिल्हा परिषद मुलांच्या शाळेत ठेवण्यात आले आहे. लहान मुलांची व महिलांची अवस्था पाहून कळंब तालुका पत्रकार संघाने महिला व मुलांसाठी कपडे वाटप केले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM-Kisan Samman Nidhi: पीएम किसान योजनेचा २३वा हप्ता रखडणार? नवे नियम काय आहेत?

Pune Drug Bust: चौफुला-धायगुडेवाडी येथे २९ किलो गांजासह २०.३० लाखांचा मुद्देमाल जप्त; यवत पोलिसांची धडक कारवाई

MI vs RR Live : ३ तासांची प्रतीक्षा अन् मुंबई इंडियन्स-राजस्थान रॉयल्स सामना सुरू होणार; किती षटकांची मॅच, किती वाजता?

Shaktipith Highway route villages : शक्तिपीठ महामार्ग कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील गावांची यादी आली; असा आहे मार्ग

Maharashtra Education DA Arrears: शिक्षक व कर्मचाऱ्यांना जुलै २०२५ ते ऑक्टोबर २०२५ महागाई भत्ता थकबाकी मार्च २०२६ च्या वेतनासह देण्याचे शिक्षण संचालकांचे आदेश

SCROLL FOR NEXT