File photo 
मराठवाडा

उस्मानाबादकरांना चिंता : रेड झोनमधून आलेल्या पोलिसावर होणार का कारवाई

सयाजी शेळके

उस्मानाबाद : रेड झोनमधून ग्रीन झोनमध्ये प्रवेश केलेल्या ‘त्या’ पोलिस कर्मचाऱ्यावर पोलिस प्रशासन गुन्हा दाखल करणार का? असा प्रश्न सर्वसामान्यांतून विचारला जात आहे.

सोलापूर जिल्ह्यात दोन पोलिस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे उघडकीस आल्याने उस्मानाबादकरांची झोप उडाली आहे. विशेष म्हणजे यातील एक पोलिस कर्मचारी सोलापूर येथून उस्मानाबाद जिल्ह्यात आला होता. त्याच्या संपर्कात आलेले कुटुंबीय व इतर अशा दहाजणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. तर अनेक जणांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

दरम्यान, सध्या जिल्ह्यात एकही कोरोनाबाधित रुग्ण नाही. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्याचा समावेश सध्या ग्रीन झोनमध्ये करण्यात आला आहे. अर्थात याचे श्रेय पोलिस, महसूल, आरोग्य विभागाला जाते. तर शेजारील सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बाधित रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे सोलापूर जिल्ह्याचा समावेश रेड झोनमध्ये झाला आहे. असे असताना सोलापूर येथे कार्यरत असलेला एक पोलिस कर्मचारी रेड झोनमधून ग्रीन झोनमध्ये म्हणजेच सोलापूर जिल्ह्यातून उस्मानाबाद जिल्ह्यात आला.

सोलापूर प्रशासनाने सर्व पोलिस कर्मचाऱ्यांची तपासणी केली. सोलापूर येथून उस्मानाबादला आला, तोच कर्मचारी कोरोनाचा पॉझिटिव्ह असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे उस्मानाबाद जिल्हा पूर्णपणे हादरला असून सर्वांचे लक्ष त्याच्या नातेवाइकांच्या तपासणी अहवालाकडे लागले आहे.

एकीकडे देशात आणि राज्यात अनेक मजूर कामगार हे लॉकडाउनमध्ये अडकले आहेत. रेड झोनमधून ग्रीन झोनमध्ये प्रवेश केल्यानंतर संबंधितावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. शिवाय त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. 
उस्मानाबाद पोलिस प्रशासनाने जिल्ह्यातील अशा अनेक जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.

कायदा हा सर्वांसाठी समान असतो. मग एखाद्या पोलिस कर्मचाऱ्याने चूक कशी केली? त्यांच्यावरही पोलिस प्रशासन कारवाई करणार आहे का? असा सवाल सामान्यवर्गातून विचारला जात आहे. बहुतांश मजूर हे अशिक्षित असतात. बाहेरच्या जिल्ह्यांतून आल्यानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल होतात. पोलिस कायद्याची माहिती असणारा, पालन करणारा असतो. असे असतानाही त्या पोलिस कर्मचाऱ्याने रेड झोनमधून ग्रीन झोनमध्ये प्रवेश केलाच कसा? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

Asia Cup Final: स्मृती मानधना - शफली वर्माचे तब्बल तीन वर्ल्ड रेकॉर्ड! भारताचे श्रीलंकेसमोर भलंमोठं लक्ष्य

SCROLL FOR NEXT