Osmanabad Breaking News 
मराठवाडा

Breaking: उस्मानाबाद जिल्ह्यात रविवारी जनता संचारबंदी, आठवडे बाजार बंद; जिल्हा प्रशासनाने घेतले अनेक महत्त्वाचे निर्णय

तानाजी जाधवर

उस्मानाबाद : कोरोनाच्या वाढत्या प्रभावाचा विचार करुन जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यामध्ये निर्बंध घालण्यास सूरुवात केली आहे. रविवारी जनता संचारबंदी तसेच सर्व आठवडे बाजार बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने बुधवारी (ता.दहा) घेतले आहे. जिल्हाधिकारी यांनी आदेशाचे पत्र काढले असुन १२ मार्चपासून ही कार्यवाही करण्यात येणार असल्याचे आदेशात म्हटले आहे. जिल्ह्यामध्ये शुक्रवारपासून (ता.१२) पुढील आदेशापर्यंत निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यामध्ये जिल्ह्यातील सर्व आठवडे बाजार पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात येत आहेत.

संपूर्ण जिल्ह्यात रविवारी जनता कर्फ्युचे पालन करण्यात यावे, या दिवशी सर्व दुकाने, बाजारपेठा बंद राहणार आहेत. यामध्ये फक्त रुग्णालयाशी सबंधित घटकांना सवलत देण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व धार्मिकस्थळे, प्रार्थनास्थळे, मंदिरे पुढील आदेशापर्यंत दर रविवारी बंद राहणार आहेत. धार्मिक विधीमध्ये पाचपेक्षा अधिक व्यक्तींना उपस्थित राहण्यास परवानगी असणार आहे. तसेच धार्मिकस्थळांच्या ठिकाणी नो मास्क नो एंट्री नियमाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेशात म्हटले आहे.

जीम, व्यायामशाळा, क्रीडा संकुले, खेळाची मैदाने, तरण तलाव आदी ठिकाणी ५० टक्के क्षमतेने वैयक्तिक सरावासाठी चालू ठेवण्यास परवानगी असेल सामाजिक अंतराचे पालन करणे अनिवार्य करण्यात आले आहे. मोठ्या स्पर्धा आयोजित करण्यास तसेच प्रेक्षकांना उपस्थित राहण्यास परवानगी असणार नाही. सर्व संमेलने, उपोषण, आंदोलने, निर्दशने, मोर्चा आदी पुढील आदेशापर्यंत करता येणार नाहीत. भाजीमंडईमध्ये सामाजिक अंतराचे पालन होईल.

सबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांनी आवश्यक कार्यवाही करण्याबाबत आदेशामध्ये म्हटले आहे. १५ मार्चपासून जिल्ह्यातील सर्व मंगल कार्यालये, फंक्शन हॉल, लॉन्स पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहेत. जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदा व पंचायतींमध्ये दहा मार्चपासुन पुढील आदेशापर्यंत नऊ ते पहाटे पाच या कालावधीत रात्रीची संचारबंदी राहणार आहे. या कालावधीत सर्व अत्यावश्यक बाबी वगळुन व्यक्तींच्या हालचालींना कडक प्रतिबंध राहणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Black Magic Ritual: महाराष्ट्र हादरला! सोळा वर्षीय मुलीवर अघोरीकृत्य, वर्षभरापासून सुरू होता प्रकार! शेवपेटीत झोपवायचा अन्...

Latest Maharashtra News Updates : पंचगंगेच्या पाणीपातळीत अर्ध्या फुटाने घट; कोल्हापुरात अद्यापही ४८ बंधारे पाण्याखाली

Vidarbha Rain: विठ्ठल पावला... विदर्भात पावसाची संततधार; यवतमाळात नदी नाल्यांना पूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, सर्वत्र पावसाचा संचा

Hinjawadi IT Park : हिंजवडीमधील समस्यांचा मुख्यमंत्री घेणार आढावा; आमदार महेश लांडगे यांचा पुढाकार

Basmat Crime: विदर्भातील तरुणीवर प्रेमाच्या नावाखाली अत्याचार; वसमतमधील आरोपी अटकेत

SCROLL FOR NEXT