Osmanabad Osmanabad
मराठवाडा

Osmanabad Corona: ग्रामीण स्तरावरच उपचाराची सुविधा; प्रशासनाची तयारी

जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांचे हाल झाले. काहीजणांना वेळेत ऑक्सिजन बेड उपलब्ध होऊ शकले नाहीत.

सकाळ वृत्तसेवा

उस्मानाबाद: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची तयारी म्हणून प्रशासनाने जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात ऑक्सिजन पुरवठा असणारे १० बेड उपलब्ध करण्याचे काम सुरू केले आहे. याशिवाय जिल्ह्यातील अन्य ग्रामीण रुग्णालयात २९० ऑक्सिजन बेड उपलब्ध करून दिले जाणार आहेत. यासंदर्भातील तयारी सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिली आहे.

जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांचे हाल झाले. काहीजणांना वेळेत ऑक्सिजन बेड उपलब्ध होऊ शकले नाहीत. ग्रामीण भागात ऑक्सिजन बेडची सुविधा उपलब्ध होत नसल्याने जिल्हा रुग्णालय तसेच तालुकास्तरावरील रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली. परिणामी, अनेक रुग्णांना वेळेत ऑक्सिजन बेड उपलब्ध झाले नाहीत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत प्रशासन यंत्रणेवर ताण येऊ नये, यासाठी आतापासूनच सावधानता बाळगली जात आहे. ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढली तर त्यांना स्थानिकस्तरावर उपचार मिळावेत, यासाठी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रावर अशा सुविधा देण्याचे नियोजन सुरू आहे.

वाढणार ७३५ ऑक्सिजन बेड
जिल्ह्यात ४४ प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. या सर्वच केंद्रावर प्रत्येकी १० ऑक्सिजन बेड तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यातील शहरातील जिल्हा रुग्णालयात १६०, उमरगा उपजिल्हा रुग्णालयात १०, परंडा उपजिल्हा रुग्णालयात १५, नळदूर्ग उपजिल्हा रुग्णालयात २५, तेर ग्रामीण रुग्णालयात १०, भूम पाच, वाशी २०, मुरूम १०, लोहारा ३०, सास्तूर १० अशी जिल्ह्यात एकूण ७३५ ऑक्सिजन बेड तयार करण्याचे काम सुरू झाले आहे.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह इतर सर्व अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. यामध्ये निर्देश दिले आहेत. त्यानुसार आता कामाची निविदा निघून एका महिन्यांत ही कारवाई पूर्ण होईल. यापुढे ग्रामीण भागातील नागरिकांना स्थानिक स्तरावर उपचाराची सोय होईल.
- कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हाधिकारी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुम्ही जे खाताय ते खरंच सुरक्षित आहे का?, खरेदी करण्याआधी हे तपासा... तुकाराम मुंढेंनी सांगितली महत्त्वाची गोष्ट

Nepal Flood Alert : नेपाळच्या महापुरात नाशिकचे पर्यटक अडकले? जिल्हा प्रशासनाकडून तातडीने हेल्पलाइन क्रमांक जारी, पाहा लिंक आणि कंट्रोल रूम नंबर

‘I Love My बायको! रितेश असं बोलला तरी जेनिलिया रुसली, दोघांचा व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले...

Marathi News Live Updates : बेरोजगारांच्या हक्कांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची पुण्यात भव्य रॅली

MPSC Paper Leak : पेपरफुटीला लव्ह स्टोरी नाही, सत्ताधारी जबाबदार; काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT