Osmanabad Nine branches of District Bank closed sakal
मराठवाडा

उस्मानाबाद जिल्हा बँकेच्या नऊ शाखा बंद

व्यवहार होत नसल्याचे कारण, आणखी १५ शाखाही ‘बंद’च्या मार्गावर

सकाळ वृत्तसेवा

उस्मानाबाद : व्यवहार होत नसल्याने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जिल्ह्यातील नऊ शाखा बंद कराव्या लागल्या आहेत. त्या अन्य शाखांत विलीन केल्या आहेत. पुढील काही दिवसात आणखी १५ शाखा बंद करण्याचे संकेत आहेत. डबघाईला आलेल्या या बँकेला बळ देण्याची गरज असून जिल्ह्यातील राजकीय पुढाऱ्यांनी यासाठी प्रयत्न करावा, असा सूर सर्वसामान्यांतून व्यक्त होत आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक ही ग्रामीण भागातील सामान्यांची अर्थवाहिनी मानली जाते. याच अर्थवाहिनीने अनेकांच्या व्यवसायाला उभारी दिली आहे. आता या येथील अर्थवाहिनीची गती मंदावत असल्याचे चित्र आहे. जिल्हा बँकेची आर्थिक स्थिती फारशी चांगली नाही. गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यातील काही शाखांत तर व्यवहारच होत नाहीत. अनेकजण इतर बॅंकांकडे वळले आहेत. विशेष म्हणजे सध्या केवळ निराधारांचे पगार देणारी बँक म्हणूनच जिल्हा बँकेची ओळख उरली आहे. गेल्या दहा वर्षांपासून याच गरिबांच्या आधारावर बँकेच्या शाखांची वाटचाल सुरू आहे. निराधारांना मिळणारे मानधन बँकेत जमा होत असल्याने काही शाखांचा डोलारा तरला आहे. मात्र वाढता खर्च, महागाईत खर्च परवडत नसल्याने बँकेने नऊ शाखा बंद करण्याचा निर्णय झाला.

राबवली वसुली मोहीम, पण..

आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी बँकेने वसुली मोहीम राबविली होती. अनेक पुढाऱ्यांनी परतफेडीपोटी धनादेश दिले आहेत. अनेक संस्थांचे धनादेश वटलेले नाहीत. असे पुढारी, संस्था कोणत्या आहेत, असा प्रश्‍न सामान्य ग्राहकांकडून विचारला जात आहे. बॅंकेची स्थिती सुधारण्यासाठी आता कोण पुढाकार घेणार, असाही प्रश्न आहे.

बॅंकेच्या या शाखा बंद

उस्मानाबाद जिल्हा बॅंकेच्या बंद झालेल्या शाखा अशा ः कंसात दुसऱ्या शाखेत विलीन झालेले ठिकाण दिले. रुईभर (मार्केट यार्ड, उस्मानाबाद), धानुरी (माकणी), कवठा (नारंगवाडी), होर्टी (नळदुर्ग), नंदगाव (जळकोट), तांदूळवाडी (शेळगाव), शिराळा (आसू), इंदापूर (वाशी), अंतरगाव (वालवड).

जिल्हा बँकेची आर्थिक स्थिती चांगली नाही. अनेक कर्मचारी निवृत्त झाले आहेत. उर्वरित कर्मचाऱ्यांवर सर्वच शाखा सुरू राहून शकत नाहीत. शिवाय अनेक शाखांतील व्यवसायही कमी आहे. त्यामुळे अशा शाखा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

- विजय घोणसे-पाटील, व्यवस्थापकीय संचालक, जिल्हा बँक, उस्मानाबाद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video : समोरा समोर दोन बसची भयानक टक्कर; अपघाताचा थरारक व्हिडिओ व्हायरल, पाहून शॉक व्हाल..

IND vs ENG 2nd Test : रवींद्र जडेजाने 'तलवार' उपसली! कपिल देव यांचा विक्रम मोडला, Sobers सारख्या दिग्गजांसोबत जाऊन बसला

Latest Maharashtra News Updates : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून बाळासाहेब लांडगे यांचं निलंबन

बाबा वेंगाचं भाकीत खरं ठरणार? पुढच्या 6 महिन्यात 'या' 4 राशी करोडपती होणार? कोणत्या त्या राशी जाणून घ्या...

Pune Accident: बसची वाट बघत उभे होते, तेव्हाच टेम्पो काळ बनून आला अन्..., दोघांचा जागीच मृत्यू, घटनेने पुण्यात खळबळ

SCROLL FOR NEXT