soyabean farmer news esakal
मराठवाडा

Osmanabad : शेतकऱ्यांच्या दिवाळीवर संकट

काढणीला आलेले निम्मे सोयाबीन पाण्यात

सकाळ डिजिटल टीम

जळकोट : सतत पडत असलेल्या पावसामुळे काढणीला आलेले निम्मे सोयाबीन सध्या पाण्यात असून काही शेतकऱ्यांनी काढलेल्या सोयाबीनला बाजार भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी संकटात सापडली आहे.शेतकऱ्यांचे नगदी समजणारे पीक म्हणून सोयाबीन पिकाकडे पाहिले जाते. तालुक्यात वीस हजारावर सोयाबीनचा पेरा करण्यात आला होता. सुरवातीला पिकेही चांगली होती. त्यानंतर अधूनमधून पाऊस झोडपत होता.

त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात पाऊस असल्याने सोयाबीनची निगराणी करता आली नाही. परिणामी सोयाबीनची वाढ खुंटली पावसाची उघडीप झाल्याने शेतकऱ्यांनी महागामोलाची औषधांची फवारणी करून सोयाबीनची निगराणी केली होती. सोयाबीनला पन्नास टक्के शेंगही लागली होती. सोयाबीन काढणीला आले होते. परंतु काढणीच्या वेळी पाऊस झोडपू लागल्याने हाताला आलेले सोयाबीन पाण्यात वाहू लागले.

त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात आश्रू येऊ लागले आहेत. ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकांची पेरणी लवकर केली होती. त्या शेतकऱ्यांनी हाताला आलेले सोयाबीन काढून घेऊन दिवाळी सण साजरा करावा म्हणून विक्रीसाठी बाजार आणले. परंतु बाजार सोयाबीनला भाव नसल्याने शेतकप्यांचा खर्चही हातात पडलेला नाही. शासनाने अतिवृष्टीचे अनुदान मंजूर केले परंतु ते सध्यातरी कागदावरच दिसून येत आहे. अनुदान दिवाळीपूर्वी लाभार्थींच्या खात्यावर पडल्यास बळीराज्याची दिवाळी कशीबशी साजरी होणार आहे. अन्यथा दिवाळी सणावर संकट निर्माण होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT