File photo 
मराठवाडा

अठरा दिवसांत १०२ जणांचे स्वॅब गेले तपासणीला

अविनाश काळे

उमरगा (जि. उस्मानाबाद) : उमरगा शहरासह तालुक्यातील एका गावात दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. प्रशासनाकडूनही प्रतिबंधात्मक उपाययोजनांबरोबरच त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या नातेवाईकांचे स्वॅब घेण्याचे काम सुरू आहे.

उमरगा तालुक्यातील दोन, तर लोहारा तालुक्यांतील एका पॉझिटिव्ह व्यक्तीचे नातेवाईक व त्यांच्या संपर्कातील व्यक्ती असे २१ मार्चपासून सात एप्रिलपर्यंत एकूण १०२ जणांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यातील ७७ जणांना होम क्वॉरंटाइन केले आहे.

दरम्यान रविवारी (ता. पाच) पाठविण्यात आलेल्या शहरातील त्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या चार नातेवाईकांचा अहवाल सोमवारी (ता. सहा) रात्री निगेटिव्ह आल्याने शहरवासियांना तात्पूरता दिलासा मिळाला आहे. आणखी सोळा जणांचे अहवाल रात्री उशीरा प्राप्त होणार होते. संसर्गाची भिती आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांतही वाढली असून मंगळवारी (ता. सात) सहा जणांचे नव्याने स्वॅब पाठविण्यात आले आहेत.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

त्यात "त्या " तरुणासोबत लुडो गेम खेळणाऱ्या तिघांचा, एक डॉक्टर, दोन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. दरम्यान, शहरात गेल्या चार दिवसांपासून किराणा दुकाने बंद आहेत. शिवाय भाजीपाला विक्रीही थांबविण्यात आली आहे. 

डॉक्टर, कर्मचाऱ्यांचे स्वॅब तपासणीला 
शहरातील त्या तरूणाच्या संपर्कातील चार जणांचे स्वॅब निगेटिव्ह आले असले तरी सोमवारी १४ जणांचे आणि उर्वरित एका गावातील दोन असे १६ जणांचे स्वॅब तपासणीला पाठविण्यात आले आहेत. त्यांचा अहवाल मंगळवारी रात्री येणे अपेक्षित होते. दरम्यान आरोग्य कर्मचाऱ्यांचेही आरोग्य धोक्यात आले असून, मंगळवारी तालुक्यातील एका आरोग्य कर्मचाऱ्यासह उपजिल्हा रुग्णालयातील एक डॉक्टर आणि रुग्णवाहिकेच्या चालकाचा स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. 

शहरात आरोग्य विभागाचे आठ पथक 
शहरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने आरोग्य विभागाने खबरदारी घेण्यासाठी आठ आरोग्य विभागाच्या पथकामार्फत वार्डनिहाय फिरुन प्रत्येक कुटुंबातील सदस्यांची विचारपुस करण्याचे काम सुरू केले आहे.

कोरोनासंबंधी लक्षणे जाणवू लागलेल्या व्यक्तींची तातडीने तपासणी केली जाणार आहे. तसेच प्रशासनाने पॉझिटिव्ह रुग्णाच्या गल्लीवर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. होम क्वारंटाइन केलेल्या व्यक्तींची संख्या ७७ आहे. त्यात वीस व्यक्तींचा चौदा दिवसाचा कालावधी संपला आहे, त्यांच्यावरील देखरेख आता कमी होईल, शिवाय होम क्वारंटाइन केलेल्या अनेक जणांचा कालावधी वरचेवर संपणार आहे. मात्र त्यांची पुन्हा तपासणी करून स्वॅब तपासणीला पाठविण्याची मागणी होत आहे. 

तीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने आरोग्य विभागाकडून दक्षता घेण्यात येत आहे. शहरात आठ पथकाकडून लक्षणे असलेल्या व्यक्तींचा शोध घेणे सुरु आहे. लक्षणे कोरोनाशी संबंधित लक्षणे असल्यास तातडीने तातडीने स्वॅब घेतले जातील. पॉझिटिव्ह रुग्णांची प्रकृती स्थिर आहे, उपचाराला ते प्रतिसाद देताहेत. एका रुग्णांकडून ऑडिओ क्लीप व्हायरल केल्याने त्याच्याविषयी तक्रार केली होती. मात्र दुसऱ्याच रुग्णाविषयी चुकीच्या पद्धतीने वृत्त प्रसिद्ध झाल्याने विशिष्ट समूहाविषयी सोशल मिडीयात सुरु असलेली चर्चा थांबवावी, सर्वांना कोरोनाविरुद्ध लढा करायचा आहे. 
- डॉ. पंडीत पुरी, वैद्यकीय अधीक्षक 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 CSK vs RR : MS Dhoni च्या जागी कुणाला मिळणार Playing XI मध्ये संधी? 'या' २० वर्षीय खेळाडूचं नाव चर्चेत...

Kolhapur - Navi Mumbai Filght : कोल्हापूरच्या हवाई सेवेत नवा अध्याय; नवी मुंबईसाठी थेट उड्डाण सुरू

Jyotiba Chaitra Yatra 2026 : कामदा एकादशीच्या मुहूर्तावर चैत्र यात्रा सुरू; गुलाल-खोबऱ्याची उधळण, सीमाभागासह राज्यभरातील भाविक दाखल

UP industry Policy: UP मध्ये आता लायसन्स राज संपणार! छोट्या उद्योगांना योगी सरकारची मोठी भेट; 'या' सुविधेमुळे ५ वर्षे तपासणीतून मुक्ती

Dattatray Bharane : 'भोंदूबाबा-महाराज हे सगळं झूट, पोरांनो त्यांच्या नादाला अजिबात लागू नका'; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचा सल्ला

SCROLL FOR NEXT