लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांवर औषधींची फवारणी करून त्याचे निर्जंतुकीकरण करताना पालिकेचे कर्मचारी. 
मराठवाडा

विनाकारण फिरणाऱ्यांना चाप; चौदा दुचाकी जप्त

अब्बास सय्यद

भूम (जि. उस्मानाबाद) : लॉकडाऊन निर्बंधाचे उल्लंघन करीत शहरात विनाकारण फिरणाऱ्या दुचाकीचालकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. एकूण १४ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

शहरासह तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन कसोशीने प्रयत्न करीत असून उपविभागीय अधिकारी मनीषा राशीनकर, तहसीलदार उषाकिरण शृंगारे, पोलिस निरीक्षक रामेश्वर खणाळ, पालिकेचे गटनेते संजय गाढवे, मुख्याधिकारी मनीषा वडेपल्ली यांच्या सूचनेनुसार शहरातील प्रमुख तीन मार्गांवर सीमाबंदी करण्यात आली आहे. दरम्यान, पालिकेच्या वतीने काही अत्यावश्यक काम असल्यास चारचाकी वाहनांना कीटकनाशक फवारणी करून सोडले जात होते. यास प्रतिसाद देत शहरातील सर्व नागरिकांनी काटेकोरपणे लॉकडाऊनच्या नियमाचे पालन केले.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

पोलिस व पालिका प्रशासनाकडून प्रत्येक प्रभागात जाऊन विनाकारण बाहेर पडल्यास कारवाई करण्यात येईल, असे सांगूनही काही नागरिक मंगळवारी (ता. सात) पुन्हा रस्त्यावर आल्यामुळे पोलिसांनी १४ दुचाकी जप्त करीत चालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला. लॉकडाऊन कालावधीत शहरातील मेडिकल दुकाने वगळता सर्वच व्यवहार ठप्प राहणार आहेत.

भाजीपालाही आता गुरुवारी सकाळी सात ते अकरा या वेळेत मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. अत्यावश्यक सेवेतील वाहने शहरात आल्यानंतर पालिका व पोलिस प्रशासनाच्या वतीने कीटकनाशक फवारणी करून सोडण्यात आले. 
अहमदनगर रोडवरील जिजाऊ चौक येथे सीमाबंदी करण्यात आली होती. येथे पोलिस व पालिका प्रशासनाच्या वतीने चारचाकी वाहनांचे निर्जंतुकीकरण करून सोडण्यात येत होते.

यावेळी पालिकेचे गटनेते संजय गाढवे, सहायक पोलिस निरीक्षक मंगेश साळवी, सहायक पोलिस उपनिरीक्षक राजेश गडवे, पोलिस नाईक, आकाश उंदरे, बाबा जाधवर, शशिकांत खोत, दगडू भुरके, बालाजी बेंबडे यांच्यासह पालिका व पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Weight Reduction : गॅस संकटाचा मोठा फटका ! घरगुती LPG सिलिंडर बाबत सरकारचा नवा निर्णय

Chhatrapati Sambhajinagar: कचरा संकलनासोबत कर वसुलीवरही नजर; नव्या कंपनीला महापालिका आयुक्तांच्या सूचना

Latest Marathi News Live Update : धाराशिव जिल्ह्यात रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका

Ahilyanagar News: अहिल्यानगर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ९८६ कोटी थकीत; ठेकेदार आर्थिक अडचणीत, २० टक्केच निधी प्राप्त!

Chhatrapati Sambhajinagar: एमपीएससी औषध निरीक्षक परीक्षेत ६९.३३ टक्के उपस्थिती; स्पर्धा परीक्षा;शहरातील ३६ केंद्रांवर ३ हजार ५६९ उमेदवारांची दांडी.

SCROLL FOR NEXT