जेवळी (ता. लोहारा) : ज्ञानेश्वर कारभारी या युवा शेतकऱ्याने पावणेतीन एकरांतील केळीचे लॉकडाउनमुळे लोकांना मोफत वाटप सुरू केले आहे.  
मराठवाडा

लाखोंचे नुकसान, तरीही गावकऱ्यांना केळीचे मोफत वाटप

सुधीर कोरे

जेवळी (जि. उस्मानाबाद) : येथील ज्ञानेश्वर कारभारी या युवा शेतकऱ्याने हाताशी आलेली पावणेतीन एकरांतील केळी लॉकडाउनमुळे बाजार ठप्प असल्याने गावातील लोकांना मोफत वाटप सुरू केले आहे. गेल्या आठ दिवसांपासून स्वतः भाड्याने जीप करून प्रत्येकाच्या घरापर्यंत केळी पोच करत असून, या युवा शेतकऱ्याच्या दानशूर कृतीचे कौतुक होत आहे.

जेवळी येथील ज्ञानेश्वर मल्लिनाथ कारभारी यांच्याकडे ३५ एकर शेती आहे. लहानपणापासून वडिलांना शेतीच्या कामात मदत करीत त्यांनी नेहमी नवीन प्रयोग करीत आधुनिक पद्धतीने शेती करण्यावर त्यांचा भर दिला. त्यांच्या शेतातून गेलेल्या नदीत सकाळ रिलीफ फंडातून दोन वर्षांपूर्वी जलसंधारणाचे काम झाले आहे.

यंदा चांगल्या पावसामुळे येथे पाणीसाठा झाला असून, ज्ञानेश्वर यांच्या कूपनलिका व विहिरीला मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या शेतात यावर्षी पाच एकरांवर केळी, तीन एकर पेरू, दोन एकर मिरची, साडेचार एकर ऊस आदींची लागवड केली आहे.

कष्ट व नियोजनामुळे त्यांची शेती बहरली आहे. आता पाच एकरपैकी पावणेतीन एकरातील केळी परिपक्व झाली आहे; परंतु लॉकडाऊमुळे केळी बाजारात पाठवता येत नसल्याने मोठे नुकसान होत आहे. मात्र नुकसान सहन करीत गेल्या आठ दिवसांपासून त्यांनी एक जीप किरायाने घेत बागेतील केळी गावात घरोघरी मोफत वाटप सुरू केले आहे. त्यांना बालाजी कारभारी, महेश सारणे, बबलू उंडरगावे, बसवराज वर्दे, मुन्ना भैरप्पा आदीने सहकार्य केले. 

शेतकऱ्यावरील संकटाची मालिका कधी खंडित होत नाही असे दिसून आले; मात्र आपल्या नुकसानीपेक्षा अशा संकट काळात लोकांच्या तोंडी घास भरवू शकलो, याचे समाधान वेगळेच आहे. १९९३ च्या भूकंपानंतरही अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळीही आपल्या शेतात पिकवलेला सर्व भाजीपाला नागरिकांना वाटप केला होता. 
- ज्ञानेश्वर कारभारी, शेतकरी 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission Controversy : 'ज्ञानेश कुमारांनी लोकसभेसह यापूर्वीच्या अनेक विधानसभा निवडणुकांत हेराफेरी केली'; राहुल गांधींचा गंभीर आरोप, मोदी-शाहांवरही निशाणा

Mumbai Rain: परतीचा पाऊस मुंबईला झोडपणार! 'या' भागात वादळी पावसाची शक्यता, हवामान विभागाचा नवा अंदाज

2007 T20 World Cup जिंकणाऱ्या भारतीय खेळाडूंना BCCI ने किती रुपये बक्षीस दिलेलं; युवराजलाही ६ सिक्ससाठी मिळालेलं खास बक्षीस

Latest Marathi News Live Update : मतचोरी करून खासदार झालेले कायदा बनवतायत : राहुल गांधी

Heart Health: हृदय निरोगी ठेवायचंय? कार्डिओलॉजिस्ट सांगतात २४ तासांचा सोपा रुटीन; काय खावं, किती व्यायाम करावा? सगळंच जाणून घ्या

SCROLL FOR NEXT