तुळजापूर : तहसील कार्यालयासमोर धान्य मिळण्यासाठी उभ्या असलेल्या महिला.  
मराठवाडा

लॉकडाऊनच्या काळात आम्ही जगावे कसे?

सकाळ वृत्तसेवा

तुळजापूर (जि. उस्मानाबाद) : गहू, तांदळासह धान्य मिळण्यासाठी शनिवारी (ता. ११) सुमारे १०० ते १२५ महिला तहसील कार्यालयाच्या गेटजवळ सकाळी नऊपासून साडेअकरापर्यंत बसून होत्या. आमच्याकडे काहीही सोय नाही, आम्ही लॉकडाऊनच्या काळात जगावे कसे, अशा भावना या महिला व्यक्त करीत होत्या.

तहसील कार्यालयाला दुसरा शनिवार असल्याने सुटीचा दिवस होता. तहसील कार्यालयाच्या गेटजवळच अनेक महिला पिशव्या घेऊन बसल्या होत्या. लॉकडाऊनमुळे सध्या कुठलाही रोजगार मिळत नाही. बहुतांश महिलांनी आधारकार्ड सोबत आणले होते. काही महिलांच्या म्हणण्यानुसार त्यांच्याकडे शिधापत्रिका नाहीत. ज्या शिधापत्रिका दुकानदारांकडे पर्यायी सोयी केलेल्या आहेत ते दुकानदार धान्य देत नाहीत.

शिधापत्रिकाधारक असणाऱ्याही काही महिला तेथे हातात शिधापत्रिका घेऊन आल्या होत्या. उषा बनसोडे म्हणाल्या, की आम्हाला धान्य नाही आम्ही कसे जगावे. कोरोनामुळे कोणतेही काम नाही. आमची समस्या गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले. सविता पांडागळे यांनी धान्य नसल्याने आम्ही आलो असून, सरकारने आम्हाला धान्य देण्याची सोय करावी. तर कांताबाई बंदपट्टे यांनी माझ्याकडे घरात सध्या धान्य नाही. मी घरातील सर्वांची सोय कशी करू, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 
 

ज्या महिलांकडे रेशनकार्ड आहे त्यांना सरकारमार्फत धान्य पुरवठा करण्यात येत आहे; तसेच अन्य योजनांच्या लाभार्भींना एक मेपासून धान्यपुरवठा होणार आहे. याशिवाय जे विस्थापित आहेत, त्यांना आपल्याकडून धान्याचा किट पुरवठा होणार आहे. 
- सौदागर तांदळे, तहसीलदार, तुळजापूर 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : खरातची अज्ञातस्थळी चौकशी, एसआयटीने चौकशीचं ठिकाण बदललं

Parbhani News: फ्लॅट संस्कृती वाढली; पण घर घेणे झाले महाग!; रेडीरेकनर दरवाढीचा फटका;नागरिकांचे बजेट कोलमडले

IPL Viral Video: ए चल निघ आता... इशान किशनला आऊट करत SRH च्याच गोलंदाजाचा रागात इशारा, मग पुढे...

Raam Navami 2026: रामनवमीपूर्वी 'या' 5 गोष्टी घरात आणा, सुख-समृद्धी निश्चित अन् माता लक्ष्मीचे आगमनही होईल

ना कुत्रा ना मांजर; पूजा सावंतला घरात पाळायचा आहे हा भयंकर प्राणी ! अभिनेत्रीचा खुलासा

SCROLL FOR NEXT