Rangapanchami Umarga 
मराठवाडा

कोरोनामुळे 'रंगोत्सवा'चा बेरंग ! कोरड्या रंगाची उधळण

अविनाश काळे

उमरगा (जि.उस्मानाबाद) : रंगपंचमीच्या रंगोत्सवात नाहुन निघण्याचा आनंद यंदा कोरोनाने हिरावून घेतला. शुक्रवारी (ता.दोन) विविध रंगाची मूक्तपणे उधळण करत चिमुकल्यासह काही तरूण,  रंगपंचमीच्या आनंदोत्सवात सहभाग घेतला. दरम्यान कोरोना संसर्गाची भिती असल्याने शहरातील विविध भागात पिचकाऱ्यामधून येणाऱ्या रंगाचे फवारे क्वचितच ठिकाणी दिसून आले.  उमरगा तालुका कर्नाटक सीमेलगत असल्याने धुलीवंदनाच्या धूळवडीच्या रंगाची जाणीव या भागातील नागरिकांना होते. त्यानंतर प्रतिक्षा असती ती रंगपंचमीची. शुक्रवारच्या रंगपंचीमसाठी लागणारे विविध रंग गुरूवारी (ता.एक) बाजारपेठेत विक्रेत्याकडे होते. मात्र खरेदीसाठी गर्दी नव्हती.

मात्र चिमूकल्यांचा रंगाच्या खरेदीसाठी हट्ट पालकांनी पुरवला आणि कांही वेळापर्यंतच रंग खेळण्याचा आग्रह पाल्यांना केला. रंग घेऊन एकमेकांना रंगात चिंब करण्यासाठी चिमूकल्याची धावपळ सुरू होती. बालगोपालांनी दुपारी मोबाईलच्या संगीत तालावर रंगोत्सवाला छोटेखानी दहीहंडीची साज दिली. शहरातील महादेव गल्ली, इंदिरा चौक, शिवाजी चौक, शिंदे गल्ली, औटी गल्ली, बँक कॉलनी, काळा मठ गल्ली, बालाजी नगर, जुनी पेठ, काळे प्लॉट, शिवपूरी रोड, एकोंडी रोड आदी भागात काही प्रमाणात  रंगोत्सव सुरू होता.



कोरड्या रंगाची उधळण
विविध कोरड्या रंगाच्या विक्रीत यंदा कमालीची घट झाली. विशेषतः महिलांनी कोरड्या रंगाची रंगपंचीम साजरी केली. दरम्यान गुड फ्राय डे ची सुट्टी त्यात  योगायोगाने रंगपंचमीचा कांही प्रमाणात आनंद सर्व शासकिय, निमशासकिय कर्मचाऱ्यांनी घेतला.  कर्मचाऱ्यांनाही कोरड्या रंगाची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला. महिला मैत्रीणीमध्येही रंगोत्सव रंगल्याचे चित्र दिसून येत होते.

अंड्याचा फंडा ...
कोरोना विषाणूच्या संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाकडून सुरक्षिततेच्या दृष्टीने विविध उपाययोजना करण्याच्या सूचना करण्यात येत आहेत. या पार्श्वभुमीवर रंगपंचमीचा उत्साह साधपणाने साजरा करण्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू होती. त्यामुळे बऱ्याच भागात साधेपणाने रंगपंचीम साजरी करण्यात आली. बालहट्ट पुरवण्यासाठी साध्या पद्धतीच्या पिचकाऱ्याची खरेदी पालकांना केली. बऱ्याच मुलांच्या हाती पाण्याच्या रिकाम्या बाटलीला पिचकारी करून रंग टाकण्यात येत होते. रसायनमिश्रीत रंगाने चेहऱ्याचा बेरंग करण्याचा प्रकार घडायचा. यंदा तो मोजक्याच ठिकाणी दिसून आला. दरम्यान कोरोनामुळे चिकन, अंडी सेवन करणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे. परंतु  कांही उत्साही तरूण एकमेकांच्या डोक्यावर अंडी फोडण्याचा फंडा रंगपंचमीच्या निमित्ताने सुरू केल्याचे चित्र दिसून आले.

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT