Osmanabad lockdown Osmanabad lockdown
मराठवाडा

Osmanabad Lockdown: जिल्ह्यात पाच दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर; जाणून घ्या कोणत्या सुविधा सुरू राहतील

जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. दिवसेंदिवस बाधितांचा आकडा वाढत आहे

सयाजी शेळके

उस्मानाबाद: जिल्ह्यात शनिवारपासून (ता. आठ) गुरुवारपर्यंत (ता. १३) कडक लॉकडाऊन (lockdown) करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी शुक्रवारी( ता. सात) घेतला आहे. आरोग्य विभागाशी निगडीत अत्यावश्यक सेवा (emergency service) वगळता बहुतांश सेवा बंद ठेवण्यात येणार असल्याने कोरोनाची चेन ब्रेक होण्यास मदत होईल अशी आशा व्यक्त होत आहे.

जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. दिवसेंदिवस बाधितांचा आकडा वाढत आहे. जरी लॉकडाउन असले तरी अनेक नागरिक रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. शिवाय भाजीबाजारात नागरिकांची तोबा गर्दी होत आहे. लॉकडाउन असूनही नागरिकांमध्ये भीती राहिली नसल्याने बिनधास्तपणे फिरत असल्याचे दिसून येत आहे. त्यामूळे कडक लॉकडाउन करण्याची मागणी सामान्य नागरिकांतून होत होती.

विशेष म्हणजे लॉकडाउन असूनही बाधितांच्या संख्येचा आलेख कमी होत नव्हता. उलट संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यात कडक लॉकडाऊन करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात होती. त्यामुळे जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी शुक्रवारी याबाबत आदेश काढले आहेत. यामध्ये किराणा, भाजीपाला यासह इतर सर्वच अस्थापना बंद असणार आहेत. दरम्यान एटीए, विद्युत, गॅस सिलेंडर सुविधा मात्र सुरू राहणार आहे. याशिवाय विमाने, रेल्वे, ॲटोरिक्षा आणि सार्वजनिक बसेस सुरू राहणार आहेत.

पाच दिवसात काय साध्य होणार?

गेल्या अनेक दिवसांपासून शनिवार, रविवार जनता कर्फ्यू होता. शनिवारी सकाळी सात वाजलेपासून कडक लॉकडाउन सुरू होणार आहे ते गुरुवारी (ता. १३) सकाळी सात वाजेपर्यंत असणार आहे. कारण गुरुवारी सकाळी सात वाजताच कडक लॉकडाउन संपणार आहे. त्यामुळे जेमतेम पाचच दिवस लॉकडाऊन असणार आहे. पाच दिवसांचा लॉकडाउन काय साध्य करायचे आहे. असा प्रश्न सामान्य नागरिकांतून व्यक्त केला जात आहे. किमान आठ दिवसांचा लॉकडाऊन करावा, अशी मागणी असताना रमझान ईद आणि अक्षय तृतीयेमुळे केवळ पाचच दिवसांचा लॉकडाउन केला असल्याची चर्चा होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

Marathi News Live Updates: मद्यपाशातून मुक्तीसाठी ५० रुग्णालयांत जनजागृती स्टॉल

SCROLL FOR NEXT