lockdown in Osmanabad lockdown in Osmanabad
मराठवाडा

उस्मानाबादमध्ये कडक लॉकडाउन? वाढत्या रुग्णसंख्येमुळे चिंता वाढली

शहरातील कोरोना रुग्णांची (covid 19) संख्या सातत्याने वाढत आहे. गेल्या १० दिवसांत रुग्णवाढीचा आलेख कमी असला तरी त्यामध्ये घट झालेली नाही

सयाजी शेळके

उस्मानाबाद: शहरात १५ मे पासून संपूर्ण लॉकडाउन (lockdown) लावण्याचे संकेत मिळत आहेत. नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, फोरम ऑफ उस्मानाबाद सिटीझन्स यांनी संपूर्ण लॉकडाऊनची मागणी करीत जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. त्यामुळे शहरात अत्यावशक सेवेतील आरोग्य विभाग (emergency service) वगळता इतर सर्व सेवा बंद ठेवण्याचे मागणी केली जात आहे.

शहरातील कोरोना रुग्णांची (covid 19) संख्या सातत्याने वाढत आहे. गेल्या १० दिवसांत रुग्णवाढीचा आलेख कमी असला तरी त्यामध्ये घट झालेली नाही. त्यामुळे शहरासाठी ही चिंतेची बाब आहे. संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन सर्वोतोपरी प्रयत्न करीत असले तरी नागरिकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. भाजीबाजारामध्ये नागरिक मोठ्या प्रमाणावर गर्दी करीत असल्याचे दिसून येत आहे. शिवाय अन्य खरेदीसाठी नागरिक रस्त्यावर गर्दी करतात. त्यामुळे संसर्गाचे प्रमाण कमी होत नसल्याचे दिसून येत आहे. शिवाय काही नागरिकातून कडक लॉकडाऊनची मागणी केली जात आहे. सध्या लॉकडाउन असूनही नागरिक रस्त्यावर फिरत असल्याने यापेक्षा कडक लॉकडाऊन लावण्याची मागणी होत आहे.

नगराध्यक्षांचे पत्र

नगराध्यक्ष राजेनिंबाळकर यांनी शुक्रवारी (ता. सात) जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. यामध्ये १५ मे पासून आठ दिवस कडक लॉकडाऊन करावे. अत्यावश्यक सेवेतील औषध, आरोग्य सेवा वगळता इतर एकही सेवा सुरू ठेवू नये, अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय प्रशासनाकडूनही याला हिरवा कंदिल मिळल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

फूकची मागणी

फोरम ऑफ उस्मानाबाद सिटीझन्स यांनी याबाबात जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, कोरोनामुळे गुरुवारी (ता. सहा) जिल्ह्यात २४ जणांचा बळी गेला आहे. तर औरंगाबाद जिल्ह्यात ५२ जणांचा बळी गेला आहे. लोकसंखेच्या तुलनेत औरंगाबादपेक्षा जिल्ह्याची लोकसंख्या २५ टक्के आहे. मात्र मृत्यू ५० टक्के आहेत. त्यामुळे जिल्ह्यात मृत्यूदर मोठा आहे. अशीच परिस्थिती राहिली तर मृत्यूदर वाढू शकतो.

शिवाय शेजारील लातूर, सोलापूर जिल्ह्यात कडक लॉकडाउन केले आहे. तेथील परिस्थिती आणि आपल्या जिल्ह्याची परिस्थिती यामध्ये फारसा फरक नाही. त्यामुळे शहरात कडक लॉकडाऊन लावून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी फूक संघटनेने केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

JP Nadda: आरक्षण हटाओ आंदोलन! शिष्टमंडळाने घेतली जेपी नड्डांची भेट; 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा

Marathi News Live Updates : नेपाळमधून जी दृश्ये समोर येत आहेत, ती अत्यंत विनाशकारी आणि हृदयद्रावक आहेत - आदित्य ठाकरे

WTC 2025-27: भारतीय संघाचं गणित बिघडलं! श्रीलंकेविरुद्धच्या 'ड्रॉ'नंतर Points Table मध्ये टीम इंडिया कोणत्या स्थानावर

Marathi Language Rule: ऑटो-टॅक्सी चालकांना दिलासा! मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदत; देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय

Car Care Tips: कारमध्ये फोन चार्ज करताय? 'या' ४ चुकांमुळे मोबाईलचा ब्लास्ट अन् कारची बॅटरी होऊ शकते डेड!

SCROLL FOR NEXT