भूम : लॉकडाउनमुळे चिकूची तोडणी, विक्री करता आली नसल्यामुळे झाडाखाली पडलेला चिकू फळांचा सडा.  
मराठवाडा

बागेत चिकूचा सडा, शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान

अब्बास सय्यद

भूम (जि. उस्मानाबाद) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमुळे बागेतील चिकूची तोड करता आली नाही, तसेच विक्रीही करता आली नाही. परिणामी, चिकूची नासाडी होत असल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. 

तालुक्यातील हाडोंग्री येथील शेतकरी बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर यांची पाच एकरांत चिकूची बाग आहे. या बागेतील झाडांना मोठ्या प्रमाणात चिकू लागले आहेत. हे चिकू परिपक्व झाले आहेत. परंतु लॉकडाउनमुळे विक्री करण्यात अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे जवळपास १० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

सध्या काढणीला आलेल्या पाच एकरांच्या बागेतील चिकू लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर विक्रीसाठी घेऊन जाता येत नसल्याने या फळांची नासाडी होत असल्याने शेतकरी बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर यांनी चिकूचे मोफत वाटप सुरू केले आहे. तरीही मोठ्या प्रमाणात बागेत पडून या फळांची नासाडी होत आहे. 

बागेतील फळविक्रीतून जवळपास १० लाख रुपयांचे उत्पन्न हाती येण्याची खात्री असताना अचानक कोरोना विषाणूमुळे लॉकडाउन करण्यात आले. लॉकडाउन होऊन दीड महिना झाला तरी माल बाजारात घेऊन जाण्यासाठी वाहनास जिल्हाबंदी आहे. तसेच लॉकडाउनमुळे मजूरही मिळत नसल्याने चिकूची फळे झाडावर पिकून गळू लागली आहेत.

ही फळे सोलापूर, बार्शी, बीड, अहमदनगर येथे मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी पाठवता आली असती. मात्र लॉकडाउन व जिल्हाबंदी असल्याने माल विकता येईना व माल विकत घेणारे व्यापारी बाजारपेठा बंद असल्याने तेही माल घेण्यास फिरकत नसल्याने सध्या या मालाचे करायचे काय, असा प्रश्न शेतकरी श्री. पाटील यांच्यासमोर आहे. चिकू फळांचा बागेतील झाडांखाली सडा पडत असल्याने शेतकरी पाटील यांनी परिसरातील परिचित सर्वांना फळे घेऊन जाण्याचे आवाहन केले. 

टरबूज, द्राक्ष, शेवगा, केळी, चिकूच्या बागा असलेल्या शेतकऱ्यांचे कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट आले आहे. शासनाने नुकसानीचे पंचनामे करून या भागातील बळिराजाला आर्थिक मदत करण्याची गरज आहे. 
- बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर, शेतकरी, हाडोंग्री 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe FDA Rules : गणेश मंडळांसाठी महत्त्वाची बातमी! आता महाप्रसादासाठी FDA चा परवाना बंधनकारक; तुकाराम मुंढेंचे कडक निर्देश, कसा भरायचा अर्ज?

Rohit Sharma on 2027 WC: निवृत्तीची चर्चा सुरूच होती, त्यात रोहित शर्माने २०२७ च्या वर्ल्ड कपबाबत केलं मोठं विधान; चाहत्यांना टेंशन

'जुळून येती रेशीमगाठी' मालिका ८० च्या दशकात असती तर कसे दिसले असते आदित्य- मेघना? AI ने बनवले कमाल फोटो

Ganesh Chaturthi 2026: गणपती बाप्पाला मोदकाचाच नैवेद्य का? जाणून घ्या मोदकामागचा खरा अध्यात्मिक अर्थ!

Marathi News Live Updates : ...तर गरबा उत्सवात सनातनी मुस्लिमांचे स्वागत करण्यास आपण तयार; अमोल ठाकरे यांची माहिती

SCROLL FOR NEXT