Osmanabad name will not change until the change is made at the revenue department level says state govt  
मराठवाडा

Osmanabad Name Change :..तोपर्यंत उस्मानाबादचं नाव बदलणार नाही; राज्य सरकारची हायकोर्टात ग्वाही

रोहित कणसे

उस्मानाबादच्या नामांतराला मंजूरी मिळाल्यानंतर सर्वत्र आनंद व्यक्त करण्यात आला. मात्र आता उस्मानाबाद जिल्ह्याला धाराशीव नाव न वापरण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.

मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणी न्यायालयाने ६ जून २०२३ रोजी पुढील सुनावणीची तारीख दिली आहे. तसेच अंतिम अधिसुचना निघण्याच्या आधीच उस्मानाबाद जिल्ह्या आणि तालुक्याला धाराशीव हे नाव वारण्यात आलं आहे. हे लक्षात घेऊन उच्च न्यायालयाने राज्याच्या महाधिवकत्यांना जिल्हा आणि तालुक्याला धाराशीव हे नाव न वापरण्याचे आदेश दिले आहेत.

यानंतर महसूल विभाग स्तरावर बदल होईपर्यंत उस्मानाबादचं नाव बदलणार नाही, अशी राज्य सरकारतर्फे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी हायकोर्टात ग्वाही दिली आहे.

औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव करण्याबाबतच्या राज्याच्या प्रस्तावास काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. गृहमंत्रालयाने अधिकृत परिपत्रक जारी करत मान्यता दिली.

उस्मानाबादचे नामांतर धाराशिव करण्यात आले असले तरी शिवसेनेकडून ही मागणी तब्बल 25 वर्षांपासून करण्यात येत आहे. दरम्याम महसूल विभागाकडून सर्व गरजांची पूर्तता होईपर्यंत धाराशीव हे नाव वापरता येणार नाहीये. राज्य सरकारतर्फे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी हायकोर्टात ग्वाही दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rain News: पोलिसांच्या धाडसी कृतीचे कौतुक! शाळेची बस पाण्यात अडकली अन्...; विद्यार्थ्यांच्या थरारक सुटकेचा व्हिडिओ व्हायरल

Santosh Deshmukh Case: ''उपमुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती, यांना पदावर ठेऊ नका'', धनंजय देशमुखांची अजित पवारांना विनवणी

Indian Ports Bill: समुद्री व्यापाराला बूस्ट! भारताचं ‘मेगा पोर्ट’ महाराष्ट्रात उभं राहणार, तब्बल 'इतक्या' कोटींचा प्रकल्प

Network Services Down: कॉल नाही, इंटरनेट गायब...; Airtel, Jio, Vi सेवा ठप्प, मोबाईल नेटवर्क डाऊन!

Latest Marathi News Live Updates: १४ गावातील रेल्वेचा बोगद्यात साचले पाणी

SCROLL FOR NEXT