File photo 
मराठवाडा

साहेब, खरीप अनुदान कधी मिळणार

जावेद इनामदार

केसरजवळगा (जि. उस्मानाबाद) : साहेब, आमचे खरीप अनुदान बँकेत कधी जमा होईल ते सांगा, आम्हाला तारीख पे तारीखच मिळत आहे. प्रत्यक्ष अनुदान कधी मिळणार, अशी विचारणा शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

गेल्या तीन महिन्यांपासून शेतकरी तलाठी कार्यालयात हेलपाटे मारत आहेत. महसूल विभागाकडून झालेल्या तांत्रिक चुकांमुळे गावातील जवळपास १५१ शेतकरी शासनाच्या खरीप पिकाच्या अनुदानापासून वंचित आहेत.

अनुदान मिळविण्यासाठी शेतकऱ्यांचे तलाठी कार्यालयात सतत हेलपाटे सुरू आहेत. मात्र आतापर्यंत तलाठ्यांकडून प्रत्येक वेळी आश्वासनेच मिळत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. गतवर्षी अतिवृष्टीमुळे झालेल्या खरीप पिकांच्या नुकसानीनंतर राज्य सरकारकडून हेक्टरी सहा हजार रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले. यात गावातील जवळपास एक हजार १२५ शेतकऱ्यांना खरिपाचे अनुदान मंजूर झाले. मात्र काही लाभार्थींच्या नावावर तांत्रिक चुकांमुळे दोनदा अनुदान जमा झाले होते.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

आतापर्यंत एकूण शेतकऱ्यांपैकी जवळपास ९७५ शेतकऱ्यांना अनुदान मिळाले आहे. मात्र उर्वरित १५० शेतकऱ्यांची कोणतीही चूक नसताना त्यांना गेल्या तीन महिन्यांपासून वंचित राहावे लागले आहे.

सध्या खरिपाच्या पेरणीसाठी शेतकरी मशागत करीत असून, वेळेवर अनुदान मिळाले तर खरिपाच्या पेरणीसाठी आवश्यक असणारी खते आणि बियाण्यांची तरी खरेदी करण्यास मदत होईल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे. मात्र प्रत्येकवेळी या आठवड्यात होईल, पुढच्या आठवड्यात अमुक तारखेला नक्की होईल, अशी आश्वासनेच मिळत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

यासंदर्भात तलाठी ए. बी. कोळी यांनी सांगितले, की गावातील एक हजार १२५ शेतकऱ्यांना अनुदान मंजूर झाले असून, यात आतापर्यंत ९७५ शेतकऱ्यांनी अनुदान उचलले आहे. तांत्रिक चुकांमुळे काही शेतकऱ्यांच्या नावावर दोनदा अनुदानाची रक्कम जमा झाली होती. त्यांनी पूर्ण रक्कम उचलली आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी पूर्ण रक्कम उचलली आहे, अशा शेतकऱ्यांकडून पुन्हा ती रक्कम वसूल करण्यात बराच वेळ गेला. आतापर्यंत १४५ शेतकऱ्यांकडून रक्कम वसूल करण्यात आली आहे. उर्वरित शेतकऱ्यांकडून वसुली सुरू आहे.

सध्या कोरोना संसर्गामुळे सर्व कर्मचारी व्यस्त आहेत. लॉकडाउन संपल्यानंतर वंचित शेतकऱ्यांच्या नावावर बँकेत अनुदान जमा केले जाईल. 
यासंदर्भात उमरगा येथील तहसीलदार संजय पवार यांनी अनुदान लवकर जमा करण्याचे प्रयत्न सुरू असून, सध्या तालुक्यावर कोरोनाचे संकट असल्याने बहुतांश कर्मचारी या कामात व्यस्त असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: कोस्टल रोडचा दहिसर-विरारपर्यंत विस्तार होणार! मुंबईसह पर्यटकांना मोठा लाभ; काय आहे नियोजन?

AUS vs IND, T20I Series: टीम इंडियाच्या मार्गातील मोठा अडथळा झाला दूर; ऑस्ट्रेलियन संघातून धोकादायक फलंदाज बाहेर

Latest Marathi News Live Update : शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी आमदार आमश्या पाडवी शेतकऱ्यांचा बांधावर

Shocking News : पती दारू पिऊन झोपी जायचा, दीर दूधात नशेचा पदार्थ मिसळून अत्याचार करायचा; सासरच्या छळाची पीडितेने सांगितली आपबीती

Nashik News : ८ महिन्यांपासून आमदारांचा निधी अडकला! ‘ई-समर्थ पोर्टल’च्या चाचणीमुळे विकासकामांवर 'ब्रेक', लोकप्रतिनिधींपुढे नवा पेच

SCROLL FOR NEXT