भूम : भाव नसल्यामुळे कलिंगडावर शेतकऱ्याने फिरविलेला नांगर. 
मराठवाडा

उठाव नसल्याने कलिंगडावर फिरविला नांगर

अब्बास सय्यद

भूम (जि. उस्मानाबाद) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक, बाजारपेठा बंद असल्यामुळे कलिंगडाला कमी दर मिळत आहे. त्यामुळे येथील एका शेतकऱ्याने कलिंगडावर नांगर फिरविण्यास सुरवात केली; मात्र मित्रांनी येत्या दहा दिवसांनंतर रमजान महिना सुरू होणार असल्याने कलिंगडाला मागणी वाढून फायदा होईल, असा सल्ला दिल्याने निर्णय बदलला.

भूम शिवारातील शेतकरी नारायण वरवडे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी उसाऐवजी कलिंगडाची लागवड करण्याला पसंती दिली; मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे कलिंगडला अपेक्षित भाव मिळत नाही. माल रानातच सुकू लागल्याने नारायण वरवडे यांनी ऐन बहरात आलेल्या कलिंगडावर नांगर फिरविण्यास सोमवारी (ता. १३) सुरवात केली.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा    

श्री. वरवडे या शेतकऱ्याचे जवळपास १० लाखांचे नुकसान झाले आहे. लॉकडाऊनमुळे बाजारपेठा बंद असून, गावागावांची सीमाही सील आहे. माल रानातच खराब होईल, त्यामुळे आताच त्याची विल्हेवाट लावावी म्हणून कलिंगडाच्या शेतीवर त्यांनी नांगर फिरविण्यास सुरवात केली. याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या मित्रांनी समजावून सांगत दहा दिवसांनंतर रमजान महिना सुरू होत असल्यामुळे उठाव होईल, असे सांगितल्याने त्यांनी नांगर फिरविणे थांबविले.

रमजान महिन्यात रोजा (उपवास) सोडण्यासाठी फळे आवश्यक असतात. त्यामुळे मागणी वाढून चांगला फायदा होईल; तसेच नाही झाल्यास आपण सर्व कलिंगड मोफत वाटप करू, अशी विनवणी बालाजी माळी, रणजित साळुंके, उमेश ढगे, सुदर्शन नलवडे या मित्रांनी केल्याने नारायण वरवडे यांनी कलिंगडमधील नांगर थांबविला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe FDA Rules : गणेश मंडळांसाठी महत्त्वाची बातमी! आता महाप्रसादासाठी FDA चा परवाना बंधनकारक; तुकाराम मुंढेंचे कडक निर्देश, कसा भरायचा अर्ज?

Rohit Sharma on 2027 WC: निवृत्तीची चर्चा सुरूच होती, त्यात रोहित शर्माने २०२७ च्या वर्ल्ड कपबाबत केलं मोठं विधान; चाहत्यांना टेंशन

'जुळून येती रेशीमगाठी' मालिका ८० च्या दशकात असती तर कसे दिसले असते आदित्य- मेघना? AI ने बनवले कमाल फोटो

Ganesh Chaturthi 2026: गणपती बाप्पाला मोदकाचाच नैवेद्य का? जाणून घ्या मोदकामागचा खरा अध्यात्मिक अर्थ!

Marathi News Live Updates : ...तर गरबा उत्सवात सनातनी मुस्लिमांचे स्वागत करण्यास आपण तयार; अमोल ठाकरे यांची माहिती

SCROLL FOR NEXT