File photo 
मराठवाडा

स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेकडून एक कोटीची मदत

राजेंद्रकुमार जाधव

उस्मानाबाद : कोरोनाविरुद्धची लढाई जिंकण्यासाठी महाराष्ट्र शासन वेगवेगळ्या उपाययोजना करीत आहे. या पार्श्वभूमीवर केलेल्या लॉकडाऊनमुळे राज्यासमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. राज्यातील आर्थिक व्यवस्था ठप्प झाली आहे. अशा परिस्थितीत स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या (कोल्हापूर) शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन म्हणजे सुमारे एक कोटी रुपयांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करण्याचा निर्णय संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी मंगळवारी (ता. ३१) घेतला आहे.

यासंदर्भात संस्थेचे मराठवाडा विभागप्रमुख, व्यवस्थापन समितीचे सदस्य व उस्मानाबाद येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांनी मंगळवारी (ता. ३१) प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे, की देशावर किंवा राज्यावर अशा प्रकारच्या आपत्ती आल्या, त्या-त्या वेळी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था नेहमीच मदतीकरिता उभी राहिली आहे. संस्थेचे संस्थापक शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी संस्थेला दिलेल्या तत्त्वानुसार आपल्या उत्पन्नातील काही वाटा समाजाकरिता खर्च करणे हे प्रत्येकाचे नैतिक कर्तव्य आहे.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

डॉ. बापूजी साळुंखे यांच्या विचारांना समोर ठेवूनच आजपर्यंत संस्थेने वेळोवेळी भूकंपग्रस्त, पूरग्रस्त, दुष्काळग्रस्त लोकांसाठी स्वयंस्फूर्तीने मदत केली आहे. आज कोरोनाच्या जागतिक महामारीचा सामना राज्य सरकार धैर्याने आणि कौशल्याने करीत आहे. अशावेळी शिक्षणक्षेत्रातील व्यक्तींनी यासाठी आपले योगदान देणे ही काळाची गरज आहे.

अशा परिस्थितीत सामाजिक जबाबदारीच्या जाणिवेतून संस्थेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे वेतन दिले असून, संस्थेने सुमारे एक कोटी रुपये धनादेशाद्वारे मुख्यमंत्री सहायता निधी- कोविड-१९ मध्ये जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी एका परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे, असे प्राचार्य डॉ. देशमुख यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात २१ वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल, नवव्या मजल्यावरून उडी मारत संपवलं आयुष्य

Pune Crime : मद्याच्या नशेत तरुणीचा विनयभंग करणाऱ्या पोलिस हवालदाराला अटक; हवालदाराला निलंबित करण्याचे दिले आदेश

Bail Pola Water Scarcity : पावसाचा खंड! पोळ्याला बोअरवेलच्या पाण्यावर बैलराजाची खांदेमळणी

Marathi News Live Updates : नागपूर RTO च्या परमिट विभागातील कथित अनियमिततेवरून मनसे आक्रमक

Swimming Competition : १३ वर्षीय विदीची ८१ किमी जलतरणात झेप; देश पातळीवर झालेल्यामुर्शिदाबाद स्पर्धेत द्वितीय क्रमांक

SCROLL FOR NEXT