बोळेगाव (ता. तुळजापूर) : गावात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यानंतर भेट देऊन पाहणी करताना डॉ. सुहास पवार, डॉ. विष्णू सातपुते, अविनाश गायकवाड, डॉ. नाजिया पठाण, महेश पाठक, श्‍याम कोकाटे आदी.  
मराठवाडा

बोळेगावातील युवकाचे आई-वडिल कोरोना पॉझिटिव्ह

जावेद इनामदार

केसरजवळगा (जि. उस्मानाबाद) : बोळेगाव (ता. तुळजापूर) येथील कोरोनाबाधित ट्रकचालक युवकाच्या आई-वडिलांचाही अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान, या रुग्णाच्या संपर्कात आलेले आलूर (ता. उमरगा) येथील एक खासगी डॉक्टर आणि कर्मचारी या दोघांचे स्वॕब सोमवारी (ता. २२) घेण्यात येणार आहेत.

बोळेगावला रविवारी (ता. २१) दुपारी तुळजापूरच्या आरोग्य पथकाने भेट देऊन या रुग्णांच्या संपर्कातील लोकांची माहिती घेतली. यावेळी आलूर येथील एका खासगी रुग्णालयात या बाधित दोघांनी उपचार घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे संपर्कात आलेले एक डॉक्टर आणि कर्मचारी यांना आरोग्य विभागाने होम क्वारंटाइन केले असून, त्यांचेही स्वॕब घेण्यात येणार आहेत.

बोळेगाव येथील एक २३ वर्षीय ट्रकचालक कोरोनाबाधित असल्याचे १६ जून रोजी स्पष्ट झाले होते. त्याच्यावर सध्या सोलापुरातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या रुग्णाच्या संपर्कातील त्याचे आईवडील व अन्य एक अशा तिघांना आरोग्य विभागाने याच दिवशी ताब्यात घेऊन तुळजापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठवले होते. या तिघांचे स्वॕब शुक्रवारी (ता. १९) लातूरच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. यात बाधित तरुणाच्या आई आणि वडिलांचा अहवाल पॉझिटिव्ह तर अन्य एकाचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. सध्या या बाधित तरुणाच्या आई-वडिलांवर तुळजापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुहास पवार, अणदूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश गायकवाड, जळकोटच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विष्णू सातपुते, सलगरा येथील आरोग्य केंद्राच्या डॉ. नाजिया पठाण, क्षयरोग पर्यवेक्षक महेश पाठक (तुळजापूर), ग्रामविकास अधिकारी श्‍याम कोकाटे, पोलिस पाटील सुरवसे आदींनी रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांची माहिती घरोघरी जाऊन घेतली. यावेळी गावातील कोणालाही सर्दी, ताप, खोकला नसल्याचे आढळून आले. पुढील चौदा दिवस दररोज सर्व्हे करण्यात येणार आहे.

बाधित ४५ वर्षीय वडील आणि ४० वर्षीय आई या दोघांनी १२ जून रोजी आलूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेतल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या रुग्णालयातील डॉक्टर व अन्य एकजण जवळून संपर्कात आल्याची माहिती मिळाली आहे. त्यानुसार आरोग्य विभागाकडून या दोघांना होम क्वारंटाइन करण्यात आले असून, त्यांचे स्वॕब तपासणीसाठी घेण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. त्यामुळे आलूर येथील नागरिकांची चिंता वाढली आहे.

यासंदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हनुमंत वडगावे यांनी सांगितले, की बोळेगाव येथे या दोघांचा अहवाल शनिवारी रात्री पॉझिटिव्ह आला आहे तर अन्य एकाचा निगेटिव्ह आला आहे. खबरदारी म्हणून गावात दररोज सर्व्हे सुरू आहे. २७ घरांतील १४७ लोकांची माहिती घेतली जात आहे. रविवारपर्यंत गावात एकही कोरोनाची लक्षणे असलेला संशयित आढळला नाही. मात्र आलूर येथील एका खासगी डॉक्टरसह एक कर्मचारी या रुग्णांच्या संपर्कात आलेले असून, त्यांनी १२ जून रोजी या दवाखान्यात उपचार घेतले आहेत. खबरदारी म्हणून त्यांचेही स्वॕब घेतले जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik UPSC Exam: दोन मिनिटे उशीर अन् UPSC परीक्षा हातातून गेली! नाशिकमध्ये विद्यार्थी-पालक आक्रमक! खड्डे, पाऊस, ट्रॅफिकचा फटका

Mumbai Rain: मुंबईला पुढील 48 तास धोक्याचे! गणरायाच्या आगमनापूर्वी पावसाचा अलर्ट, हवामान खात्याकडून मोठी अपडेट

US Open Final: अल्काराझला हरवलं, टियाफोलाही धुतलं! बेन शेल्टन US Openच्या फायनलमध्ये; २२ वर्षांनंतर अमेरिकेचा खेळाडू इतिहास रचणार?

Marathi News Live Updates : जरांगे पाटील यांच्या मुंबईकडे जाण्याच्या घोषणेनंतर नांदेडमधील मराठा बांधव सज्ज

BRICS Dinner: शी जिनपिंग मोदींच्या मेजवानीला गैरहजर; पुतिनसह ब्रिक्स नेत्यांनी घेतला भारतीय शाकाहारी पदार्थांचा आस्वाद, मेनू काय होता?

SCROLL FOR NEXT