Osmanabad News
Osmanabad News 
मराठवाडा

उस्मानाबाद मंडळाच्या तब्बल ६७० बसफेऱ्या रद्द

सकाळ वृत्तसेवा

उस्मानाबाद : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने शहरासह तालुक्यातील बसस्थानके ओस पडत असून गेल्या सात दिवसांत एसटी महामंडळाच्या उस्मानाबाद विभागाला तब्बल ६७० फेऱ्या रद्द कराव्या लागल्या आहेत. यातून लाखो रुपयांचा फटका बसला आहे. शिवाय प्रवाशांच्या सेवेसाठी बसचे निर्जंतुकीकरण केले जात असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली आहे. 

कोरोना विषाणूच्या फटक्याने जिल्ह्यातील एसटी महामंडळाची सेवाही पूर्णपणे ठप्प होण्याच्या मार्गाकडे जात आहे. गेल्या सहा दिवसांत सातत्याने फेऱ्या रद्द कराव्या लागत आहेत. दोन-तीन दिवसांपूर्वी पुणे, मुंबई, औरंगाबाद अशा महानगरांतून जिल्‍ह्यात येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी होती.

त्यातच खबरदारीचा उपाय म्हणून शासनाने शाळांना सुटी दिली; तसेच नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवासी बसपासून दूर आहेत. अनेकजण स्वतःची दुचाकी, चारचाकीला प्राधान्य देत असून बसचा प्रवास टाळीत आहेत. त्यामुळे कायम वर्दळ असणारी बसस्थानके ओस पडली आहेत.

लाखोंचे नुकसान 

गेल्या बुधवारपासून (ता. ११) महामंडळाच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होत आहे. सातत्याने प्रवासी संख्या कमी होत आहे. दोन-तीन दिवसांपासून प्रवासी संख्या चांगलीच रोडावली आहे. गेल्या सात दिवसांत तब्बल ६७० बसच्या फेऱ्या रद्द झाल्या आहेत. म्हणजेच तब्बल एक लाख पाच हजार किलोमीटरचा प्रवास थांबला आहे.

त्यामुळे जिल्ह्याच्या एसटीच्या विभागाला तब्बल ३० ते ३५ लाख रुपयांचा फटका बसला आहे. दरम्यान, दोन दिवसांपासून तर महामंडळाचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. मोठ्या प्रमाणात असलेल्या कर्मचाऱ्यांना काम नाही. शिवाय त्यांचा पगार देणे गरजेचे आहे. त्यामुळे जिल्ह्याला लाखोंचा फटका सहन करावा लागत आहे. 

लांबपल्ल्याच्या गाड्यांच्या फेऱ्यात १५ टक्क्यांपर्यंत कपात केली आहे. तर ग्रामीण भागात जास्त फटका बसत असून ४० टक्के फेऱ्या रद्द केल्या आहेत. सध्या ज्या भागात जाण्यासाठी प्रवासी आहेत, त्याच मार्गावर बस सुरू करण्यात आल्या आहेत. प्रवाशांची मागणी बघून सेवा दिली जात आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी शहर बसस्थानकाची प्रत्येक दोन तासाला स्वच्छता केली जात आहे; तसेच बसची स्वच्छता केली जात असून निर्जंतुकीकरण केले जात आहे. प्रवाशांचा आणि वाहक-चालकांचा संपर्क होऊ नये, यासाठी चालक-वाहकांना मास्क दिले जाणार आहेत. 
- ए. ए. जानराव, जिल्हा वाहतूक नियंत्रण अधिकारी, उस्मानाबाद. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकली, MI आत्मसन्मानासाठी तर KKR प्ले ऑफसाठी खेळणार

Lok Sabha Poll 2024 : काम करा अन्यथा उमेदवारी विसरा; फडणवीसांची आमदार, माजी नगरसेवकांना तंबी

ब्रिजस्टोन इंडिया’च्या सीएसआर उपक्रमाची 16व्या ग्लोबल सीएसआर अँड ईएसजी समिट अँड अवॉर्डस् 2024 मध्ये बाजी

Akola News : जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे बनावट व्हाट्सअप अकाऊंट; नागरिकांकडे पैशांची मागणी

आडातच नाही तर पोहऱ्यात येणार कोठून? जलवाहिन्या टाकल्या परंतु पाण्यावर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT