file photo 
मराठवाडा

ग्रीन झोनमध्ये आहात, रेड झोनमध्ये जायचं नसेल तर....

सयाजी शेळके

उस्मानाबाद : ग्रीन झोनमध्ये असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील नागरिकांना आता आठवड्यातून तीन दिवस केवळ पाच तास किराणा व भाजीपाला मिळणार आहे. परिणामी अचानक नागरिकांची गर्दी वाढून सोशल डिस्टन्सिंग फज्जा उडण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी सोमवारी (ता. चार) हे आदेश काढले आहेत.

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सोशल डिस्टन्स हा महत्त्वाचा घटक मानला जातो. त्यासाठी बाजारपेठेतील गर्दीवर नियंत्रण ठेवणे गरजेचे असते. उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या २१ दिवसांपासून एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेला नाही. त्यामुळे जिल्ह्याचा समावेश ग्रीन झोनमध्ये करण्यात आला आहे. तर शेजारील लातूर आणि बीड हे दोन जिल्हे ऑरेंज झोनमध्ये समाविष्ट आहेत.

या दोन्ही जिल्ह्यांमध्ये नागरिकांना दररोज किराणा आणि भाजीपाला घेण्याची परवानगी आहे. मात्र उस्मानाबाद जिल्ह्याचा समावेश ग्रीन झोनमध्ये असतानाही येथे आठवड्यातून तीन दिवस केवळ पाच तास किराणा आणि भाजीपाला घेण्याची परवानगी नागरिकांना देण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी मुधोळ-मुंडे यांनी सोमवारी (ता. चार) हे आदेश काढले आहेत. याशिवाय इतर आस्थापनाही तीन दिवस केवळ पाच तास सुरू राहणार आहेत. कोणतीही वस्तू खरेदी करण्यासाठी केवळ पाच तासाचा अवधी मिळणार असल्याने नागरिकांची गर्दी त्या पाच तासाच्या कालावधीत पडणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

सोशल डिस्टन्स राखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. मात्र यातून सोशल डिस्टन्स पाळण्याऐवजी या प्रयत्नांचा फज्जा उडण्याचे संकेत आहेत. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी किराणा आणि भाजीपाला खरेदीची प्रक्रिया ही दररोज असावी, अशी भूमिका अपेक्षीत आहे. जिल्हाधिकारी मुधोळ मुंडे यांनी मात्र तीन दिवसांत पाच तासच किराणा आणि भाजीपाला घेण्याचे आदेश काढल्याने त्यांच्या या भूमिकेवर अनेक नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहेत. त्या पाच तासात जर गर्दी झाली तर याला जबाबदार कोण असाही प्रश्न सामान्य नागरिक विचारत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कूलिंग चेंबरमध्ये स्फोटानंतर इमारत कोसळली, ९ कामगारांचा मृत्यू; माजी आमदाराच्या मालकीच्या कोल्ड स्टोरेजमध्ये दुर्घटना

Navi Mumbai: मुलगा घरी एकटाच, पालक घरी येताच समोर जे दिसलं त्यानं पायाखालची जमीनच सरकली, नवी मुंबईत काय घडलं?

IPL सारखीच नवी टी२० स्पर्धा, 'या' क्रिकेट बोर्डानं केली घोषणा; सुरुवात कधी?

IPL 2026 Video: धोनी वयाच्या ६० व्या वर्षापर्यंत खेळणार? थालाचं उत्तर ऐकून आख्ख्या स्टेडियममध्ये जल्लोष

अमेरिकेचं एक पाऊल मागे, युद्धाला ब्रेक! इराणसोबत सकारात्मक चर्चा, डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT