परंडा : गीतातून कोरोनाविषयी जनजागृती करताना जनसेवा कलापथक.  
मराठवाडा

आला विषाणू जीवघेणा, त्याचं नाव हाय कोरोना....

आनंद खर्डेकर

परंडा (जि. उस्मानाबाद) : ‘आला विषाणू जीवघेणा, त्याचं नाव हाय कोरोना, कोरोनाने जीव जाण्यापेक्षा जरा घरातच बसा ना...’ अशा गीतांतून शाहीर सिद्धार्थ सावंत समाजप्रबोधन करीत आहेत. परंडा तालुक्यातील चिंचपूर (बुद्रुक) येथील जनसेवा कलापथकाच्या माध्यमातून शाहीर सावंत कोरोना या महामारीविरुद्ध जनजागृती करीत ‘घरी बसा, सुरक्षीत राहा’ असे आवाहन करीत आहेत.

विविध विषयांवर समाज प्रबोधन करणे हा त्यांचा पिढीजात पिंडच आहे. त्यांचे वडील नवनाथ सावंत हेसुद्धा शाहीर होते. शाहिरीच्या माध्यतातून त्यांनी पाणी या विषयावर जनजागृतीसाठी मोठे योगदान दिले आहे. ‘पाण्यानं पेटलेली आग’ हे लोकनाट्य लिहून गावागावांत जनजागृती करीत शाहिरी बाण्यातून ते सर्वसामान्यांपर्यंत पोचविले.

वडिलांचा वारसा सक्षमपणे चालवीत सिद्धार्थ सावंत हे सुद्धा विविध विषयांवर स्वतः गाणी लिहून समाजप्रबोधन करीत आहेत. व्यसनाधीनता, दारूबंदी, लोकसंख्या नियंत्रण, महिला व बालविकास, पाणी अशा अनेक शासकीय उपक्रमांमध्येही मागील वीस वर्षांपासून सहभाग घेत ते जनजागृती करताहेत.

कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी ते जनप्रबोधन करीत आहेत. जागृती फाउंडेशन, जनसेवा कलापथकाच्या माध्यमातून जवळपास दहा गाणी त्यांनी जागृती जत्थ्याला सोबत घेत सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल करीत जनजागृती करण्यावर भर दिला आहे. ‘करण्या कोरोनावर मात, घरीच बसा ना, लावू पळवून त्याला, विषाणू कोरोना उभा आहे दारात’ या गाण्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. 
प्रत्येकजण सरकारला ऐनकेन प्रकारे मदत करीत असून, यात जागृती फाउंडेशनही मागे नाही.

आपत्कालीन काळात सरकारची भूमिका शाहिरी कलेतून ते सर्वसामान्यांपर्यंत पोचविण्याचे काम करीत आहेत. लॉकडाउनमध्ये फेसबुक, व्हॅाट्‍स‌ॲप, यू-ट्यूबचा वापर करीत कोरोनासंबंधी जनजागृती सुरू आहे. जागृती कलामंचाकडून सिद्धार्थ सावंत यांच्यासह सुनील बनसोडे, भीमाई बनसोडे, बुवासाहेब साठे, लक्ष्मण लोहार, राम लोहार, सागर बनसोडे हे सोशल डिस्टन्सचे पालन करीत आपल्या छोट्याशा वस्तीतून शाहिरीच्या माध्यमातून कोरोनापासून सतर्कता बाळगण्यासाठी जनजागृती करीत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election : गोकुळ निवडणुकीत महायुतीत मिठाचा खडा? मुश्रीफांच्या 3500 ठरावांच्या दाव्यावर महाडिकांचा कडाडून सवाल, 'त्या' आकडेवारीमागचा उद्देश काय?

सकाळी जाग येताच नोकरी गेल्याचे मेल; Oracleमध्ये पुन्हा कर्मचारी कपात

Gram Panchayat Election : दिवाळीनंतर ग्रामपंचायत निवडणुकांचा वाजणार बिगुल? SIR ने वाढवली इच्छुकांची धाकधूक, नव्या कारभाऱ्यांसाठी करावी लागणार प्रतीक्षा!

Latest Marathi News Update : धनुष्यबाण राहणार की जाणार? शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सुनावणी

Gokul Election : 'गोकुळ'वरून कोल्हापुरात राजकीय वातावरण तापलं! मुश्रीफांकडून आकडेवारी, इशारा कुणाला?; 'तुमची गरज नाही' असा अप्रत्यक्ष दिला संदेश

SCROLL FOR NEXT