परंडा : येथील रा. गे. शिंदे महाविद्यालयातील निवारागृहातील नागरिकांना देण्यात येत असलेले योगाचे प्रशिक्षण.  
मराठवाडा

निवारागृहातील क्वारंटाइन गिरवताहेत योगाचे धडे

आनंद खर्डेकर

परंडा (जि. उस्मानाबाद) : येथील शिक्षणमहर्षी गुरुवर्य रा. गे. शिंदे महाविद्यालयांमधील निवारागृहामध्ये ठेवण्यात आलेल्या परजिल्ह्यातील नागरिकांना दररोज योगाचे प्रशिक्षण देऊन त्यांना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

योग प्रशिक्षक अनिल कापुरे हे दररोज महाविद्यालयामध्ये येऊन तेथील निवारागृहातील १८ जणांना योगाचे प्रशिक्षण देत आहेत. विविध विभागांतील कर्मचारी नियुक्त करून या नागरिकांची देखरेख केली जाते. या सर्व लोकांना विविध विभागांतील कर्मचारी तीन शिफ्टमध्ये सहकार्य करतात.

सकाळी दहा ते सहा, सायंकाळी सहा ते दोन, रात्री दोन ते दहा अशा शिफ्टमध्ये शाखा अभियंता एस. व्ही. टोंपे, इंद्रजित कांबळे, स्थापत्य अभियंता एम. एम. कुलकर्णी, कनिष्ठ अभियंता बी. के. शिराम, लिपिक बाळू बोराडे, स्थापत्य अभियंता बी. आर. खुने, शाखा अभियंता आर. बी. भुतेकर, स्थापत्य अभियंता सहायक दिनेश ठोंगे व कनिष्ठ लिपिक टी. डी. शिंदे हे कर्मचारी या ठिकाणी दररोज शासनाच्या नियमाप्रमाणे त्यांच्या जेवणाची चहा-पाण्याची सोय करून त्यांना सुरक्षितरीत्या महाविद्यालयामध्ये ठेवले जात आहे. पोलिस प्रशासन तसेच डॉक्टर वेळोवेळी त्यांना भेट देत त्यांच्या आरोग्याची विचारपूस करीत आहेत.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

डॉ. शहाजी चंदनशिवे यांनीही लोकांना आरोग्याविषयी मार्गदर्शन केले. सकाळी सात ते आठ यादरम्यान हे योग प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला जात आहे. महाविद्यालयातील कर्मचारी अधीक्षक भाऊसाहेब दिवाणे, भागवत दडमल यांनी शासनाच्या आदेशाप्रमाणे त्यांना आवश्यक असलेली सेवा सतत पुरवण्याचे काम करीत आहेत. प्रशिक्षक अनिल कापुरे दररोज या लोकांना मास्क आणि सॅनिटायझर देत आहेत. नायब तहसीलदार गणेश सुपे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दीपक इंगोले हे भेट देत आहेत. त्यांच्याविषयी माहिती घेत आहेत. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanchita Ugale: एक्स प्रियकराचा त्रास, आरोग्य समस्या की नैराश्य? अभिनेत्री संचिता उगलेने का संपवलं आयुष्य? मैत्रिणीनं सगळंच सांगितलं!

IND A vs SL A, ODI: महागात पडली १० धावांची पेनल्टी; भारताने हातातला सामना सुपर ओव्हरमध्ये गमावला...

Strait of Hormuz: शांतता करार झाला, पण होर्मुजमधून जहाजांची वाहतूक धोकेदायकच! आंतरराष्ट्रीय शिपिंग संघटनेने स्पष्ट केली भूमिका

National Volleyball Player Dies: राष्ट्रीय हॉलीबॉलपटू व प्रयोगशील शेतकरी रमेश सहालुगडे यांचे विहिरीत पडून अपघाती निधन

Pune Civic Schools PPP: आकांक्षा फाऊंडेशनसह अन्य संस्थांना मनपा शाळांचे दरवाजे खुले; गणेश बिडकर यांची घोषणा

SCROLL FOR NEXT