medical stoar 
मराठवाडा

अन्यथा...दुकाने बंद ठेवण्याचा इशारा; परभणीत औषध विक्रेत्यामध्ये असंतोषाचे वातावरण

राज्यासह संपूर्ण देशात कोरोनाच्या प्रादुर्भावाची पहिली लाट ओसरुन दुसऱ्या लाटेला आपण सर्वजण सामोरे जात आहोत

गणेश पांडे

परभणी ः कोरोना काळात स्वत: चा जीव धोक्यात (Corona virus) घालून २४ तास औषधींचा पुरवठा नियमित व सुरळीत व्हावा यासाठी झटणाऱ्या औषध विक्रेत्यांमध्ये केंद्र व राज्य सरकारबद्दल (State government) असंतोष खदखदतोय. याचे कारण म्हणजे या महामारीच्या काळात अत्यावश्यक सेवा देवूनही कोरोना योध्दा म्हणुन औषध विक्रेत्यांचा (medical shop closed) सन्मान करण्यात दोन्ही विसरले आहेत. आमचा कोरोना योध्दा म्हणून सन्मान करावा व लसीकरणास प्राधान्य द्यावे अन्यथा आम्ही आमची दुकाने बंद ठेवू असा इशाराच औषध विक्रेत्याच्या संघटनेने दिला आहे. (Otherwise ... a warning to keep shops closed; Atmosphere of dissatisfaction among drug dealers in Parbhani)

राज्यासह संपूर्ण देशात कोरोनाच्या प्रादुर्भावाची पहिली लाट ओसरुन दुसऱ्या लाटेला आपण सर्वजण सामोरे जात आहोत. या महामारीत अग्रक्रमाने काम करणाऱ्यांच्या यादीत कोरोना योध्दा म्हणुन औषधी विक्रेत्याच्या सेवेकडे सरकारने संपूर्णत: दुर्लक्ष केले आहे असा आरोप महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशने केला आहे. औषधी विक्रेत्यांचा प्रत्यक्ष संबंध हा कोविड रुग्णांशी अथवा त्यांच्या संपर्कात आलेल्या नातेवाईकांशी येतो. त्यामुळे आता पर्यंत देशात २०० पेक्षा अधिक औषध विक्रेते कोरोनाचे बळी पडलेले आहेत. एक हजारच्या जवळपास त्यांचे नातेवाईक बाधित झालेले आहेत. असे असूनही केंद्र व राज्य सरकारने कोरोना योध्दा म्हणून सन्मान तर दिला नाहीच परंतू साधे लसीकरणात ही प्राधान्य देण्याचे औदार्य देखील दाखविले नाही. याची खंत औषध विक्रेते व्यक्त करत आहेत. या संदर्भात संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष जगन्नाथ शिंदे म्हणाले, देशात लसीकरण कार्यक्रम सुरु झाला. औषधी विक्रेता व तेथील कर्मचारी हे आपल्या जीवावर उदार होऊन २४ तास सेवा देत आहेत. त्यामुळेच संपूर्ण देशासह महाराष्ट्रात औषधी पुरवठा सुरळीत राहण्यात मोठी मदत झालेली आहे. परंतू सरकारच्या भूमिकेबाबत आम्ही तीव्र नाराज आहोत.

हेही वाचा - सामाजिक बांधिलकी : अंजलीच्या विवाहाला व्हाट्सअप ग्रुपची मदत

संघटनेने वेळोवेळी या संदर्भात पत्र व्यवहार केलेला आहे. परंतू त्याचीही दखल शासनाने घेतली नाही. सरकारची भूमिका अशीच राहिल्यास सभासदांचा वाढता दबाव लक्षात घेता संघटनेला संपू्र्ण लॉकडाऊनमध्ये सहभागी होऊन व्यवसाय बंद करण्याशिवाय पर्याय राहणार नाही.

- संजय मंत्री, जिल्हाध्यक्ष, जिल्हा केमिस्ट अॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशन, परभणी

परभणी जिल्हा केमिस्ट अन्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसह सभासदामध्ये तीव्र नाराजी आहे. औषध विक्रेत्यांना कोरोना योध्दा म्हणून सन्मान द्यावा अशी मागणी केली आहे. ही मागणी मान्य न झाल्यास नाईलाजास्तव आम्हाला दुकाने बंद ठेवून सरकारच्या धोरणाचा निषेध करावा लागणार आहे.

- सुर्यकांत हाके सचिव, जिल्हा केमिस्ट अॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशन, परभणी

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Cricket in Trouble: पाकिस्तानला 'नाटक' महागात पडणार, ICC ने पाठवला ई मेल! PCB ने स्पर्धेचे अनेक नियम मोडले, आता...

Asia Cup 2025 Super 4 Schedule: भारतीय संघ कोणत्या तारखांना कोणाला भिडणार? जाणून घ्या सुपर ४ चं संपूर्ण वेळापत्रक

AFG vs SL Live: लक्ष्य १७० धावांचे, पण १०१ धावा करताच श्रीलंका पोहोचली Super 4 मध्ये; अफगाणिस्तानला लटकवले, कसे ते घ्या जाणून...

Adani Group News : अदानी समूहाला मोठा दिलासा; 'SEBI'ने 'हिंडेनबर्ग'चे आरोप फेटाळले!

Khadakwasla Dam : खडकवासला धरणातून ३१ तासांनी १२६३ क्युसेक विसर्ग सुरू

SCROLL FOR NEXT