mahur 
मराठवाडा

नवीन १११ विंधन विहिरी करणार टंचाईवर मात 

बालाजी कोंढे

माहूर : माहूर तालुक्यात भिषण पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. आमदार भिमराव केराम यांनी ग्रामीण भागात नागरिकांची, महिलांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती होऊ नये म्हणून टंचाई आढावा बैठक घेऊन उपाययोजना करण्याच्या सूचना प्रशासनास दिल्या होत्या. (ता.एक) जानेवारी ते मार्च २०२० पर्यंतचा १६१ लक्ष रूपयांचा पाणी टंचाई निवारनार्थ टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती गटविकास अधिकारी विशालसिंह चव्हाण यांनी दिली.

माहूर तालुक्यात दरवर्षी ग्रामीण भागात भिषण पाणीटंचाई निर्माण होत असते. त्यावर उपाय म्हणून विहिर अधिग्रहण करणे किंवा त्या गावास टँकरने पाणीपुरवठा करणे हे प्रशासन करित आले आहे. पाणीटंचाई कायमस्वरूपी दूर झाली पाहिजे अशी महिलांची मागणी आहे. 

तालुक्यात ६२ ग्रामपंचायती
तालुक्यात ६२ ग्रामपंचायती आहेत. जानेवारी ते मार्च महिन्यापर्यंत करण्यात आलेल्या पाणीटंचाई कृती आराखडयात नवीन १११ विंधन विहीरी घेणे- ५५ लक्ष ५० हजार. अंजनखेड, आसोली, बोंडगव्हाण चौफुली, सावरखेड, बोरवाडी, भिमपूर, दत्तमांजरी, गोडवडसा, रामुनाईक तांडा, हरडफ तांडा, ईवळेश्वर, दासुनाईक तांडा, मदनापूर, मालवाडा, रामपूर, पडसा, पवनाळा तांडा, रुई, सेलु, जुनी टाकळी, वानोळा येथील नळ योजनेची विशेष दुरुस्ती करण्यासाठी- ५६ लक्ष रुपये.

१७० कामाकरिता १६१ लक्ष रूपयांचा टंचाई आराखडा
बारा गावात तात्पूरती पूरक नळ योजना दुरुस्ती करिता- ३९ लक्ष रुपये, दहा विधंन विहिर विशेष दुरुस्ती - एक लक्ष रुपये, सतरा विहीरीचे खोलीकरण व गाळ काढण्याकरिता- नऊ लक्ष पन्नास हजार रुपये अशा १७० कामाकरिता १६१ लक्ष रूपयांचा टंचाई आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती गटविकास अधिकारी विशालसिंह चव्हाण यांनी दिली आहे.

प्रशासनाचे समन्वयातून पाणीटंचाईवर काम
विशेष म्हणजे पहिल्या तीन महिन्याच्या टप्प्यात एकाही गावात टँकर अथवा विहीर अधिग्रहण करण्यात आलेली नाही. तहसिल व पंचायत समिती प्रशासन समन्वयातून पाणीटंचाईवर काम करित असल्याने टंचाईमध्ये दिरंगाई होणार नाही, अशी सध्याची परिस्थिती आहे.

टंचाईची माहिती प्रशासनास द्यावी
माहूर तालुक्यातील नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी हैराणी होवू नये याकरिता ग्रामसेवक, सरपंचानी दक्ष राहावे. जिथे टंचाई असेल तिथली माहिती प्रशासनास द्यावी. तत्काळ उपाययोजना केली जाईल. टंचाई काळात हलगर्जीपणा खपवून घेणार नाही. - भिमराव केराम, आमदार, किनवट- माहूर.

प्रस्ताव आल्यानंतर निर्णय
माहूर तालुक्यात पहिल्या टप्प्यात कुठेही टँकर सुरू नाही किंवा विहीर अधिग्रहण करण्यात आले नाही. प्रस्ताव आल्यानंतर त्यावर निर्णय घेण्यात येईल. - सिध्देश्वर वरणगावकर, तहसिलदार, माहूर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Doctor killed in Tilari : आंध्रप्रदेशातील डॉक्टरचा तिलारीच्या जंगलात खून! दरीत मोटार फेकली; खुनामागचं कारण...

AUS vs IND: रोहित...कोहली... चाहत्यांचा जयघोष! सिडनी वनडेपूर्वी अन् नंतर कसं होतं संपूर्ण वातावरण, BCCI ने शेअर केला Video

Latest Marathi News Live Update : संत गोरोबाकाकाची पालखी पंढरीच्या कार्तिकी वारीसाठी पंढरपूरकडे मार्गस्थ

अप्पीला मिळाला तिचा रियल लाईफ अर्जुन ! आज पार पडला साखरपुडा; निवेदिता सराफांची खास हजेरी

रील्स प्रेमींसाठी खुशखबर! Instagram ने लॉन्च केलं मजेदार फीचर, आधी बघितलेली कोणतीही रील सेकंदात सापडणार, काय आहे Watch History सेटिंग?

SCROLL FOR NEXT