file photo 
मराठवाडा

परभणी जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन प्लॅन्टची उभारणी होणार

गणेश पांडे

परभणी : येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातील भरती रुग्णांसाठी लागणाऱ्या ऑक्सीजनची आता कायमस्वरूपी व्यवस्था करण्यात येत आहे. जिल्हा रुग्णालयातच ऑक्सीजन प्लॅन्टची उभारणी केली जाणार असून त्यासाठी काम सुरु करण्यात आले आहे. हा प्लॅन्ट उभा राहिला तर जिल्हा रुग्णालयातील रुग्णानासाठी हे वरदानच ठरणार आहे.

जिल्हा शासकीय रुग्णालयातील रुग्णांना ऑक्सीजनची कायमस्वरुपी सुविधा उपलब्ध व्हावी, यादृष्टीने ऑक्सीजन प्लॅन्ट उभारण्यात येणार आहे. त्यासाठी सोमवारी (ता.२७) स्थळ निश्चित करण्यात आले आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात ऑक्सीजनची सुविधा उपलब्ध आहे. मात्र ऑक्सीजनकरिता मोठ्या प्रमाणावर सिलेंडर वापरले जातात. परंतू कधी कधी सिलेंडरचा पुरवठा कमी प्रमाणात होतो. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील रुग्णांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. कोरोना विषाणु संसर्गा सारख्या आपत्तीच्या काळात ऑक्सीजनचा सुरळीतपणे व पुरेसा पुरवठा व्हावा, यादृष्टीने विचार विनिमय सुरू होता. विशेषतः कोरोना विरूध्दच्या या लढाईत हा प्रकल्प पूर्ण व्हावा यासाठी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी विशेष प्रयत्न सुरु केले आहेत.

तज्ञा बरोबरच्या चर्चेअंती अंतिम आराखडा तयार झाला आहे

या अनुषंगाने गांभिर्याने संबधित यंत्रणेतील अधिकाऱ्यांशी विचार विनिमय केला. विशेषतः संबंधितांनी पाठपुरावा सुरू केला. त्यामुळे या ऑक्सीजन प्लॅन्ट उभारणी संदर्भात तज्ञा बरोबरच्या चर्चेअंती अंतिम आराखडा तयार झाला आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयातील जिल्हा शल्यचिकित्सकांच्या निवासस्थानाजवळ यासाठी जागा निश्‍चीत करण्यात आलेली आहे. या निश्चित केलेल्या जागेत तो ऑक्सीजन प्लॅन्ट उभारणीचा निर्णय झाला आहे. हा प्लॅन्ट उभारणीसाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या घेण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे. परवानग्या हाती आल्यानंतर अवघ्या तीन महिन्यात तो प्लॅन्ट उभारल्या जाईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. हा ऑक्सीजन प्लॅन्ट सुरु झाल्यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयातील रुग्णांना ऑक्सीजनची कमतरता भासणार नाही. कोरोना विषाणु संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ही योजना निश्चित परभणीकरांसाठी फायद्याची ठरणार आहे अश्या प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरीकांमधून व्यक्त होत आहेत.

जुने बांधकाम पाडण्यास सुरुवात

ऑक्सीजन प्लॅन्टसाठी जागा निश्‍चीत केलेल्या ठिकाणीची पाहणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी.पी., जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रकाश डाके, उपविभागीय अधिकारी डॉ. संजय कुंडेटकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर सुरवसे, संबंधीत विभागप्रमुख डॉ. दुर्गादास पांडे आदीनी केली आहे. सोमवार (ता. २७) पासून जुने बांधकाम पाडण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
 

संपादन - प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asim Sarode: असीम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द; 'हे' वादग्रस्त विधान भोवलं

World Cup 2025: ...अन् हरमनप्रीत कौर कोच अमोल मुजूमदारला पाहताच पडली पाया; विश्वविजयानंतरचा भावूक करणारा क्षण

Latest Marathi News Live Update : इचलकरंजी महापालिका निवडणूकीत पाणी प्रश्न पेटणार

Crime: तुझ्याशी बोलायचंय, काम झाल्यावर भेट...; विवाहित प्रियकरानं महिलेला बोलवलं, भयंकर कट रचून संपवलं, कारण काय?

Priyanka Gandhi: हवाप्रदूषण कमी करण्यासाठी एकत्र काम करू; खासदार प्रियांका गांधी वद्रा यांचे केंद्र सरकार आणि दिल्ली सरकारला आवाहन

SCROLL FOR NEXT