हेमंत पाटील 
मराठवाडा

हिंगोली जिल्ह्यासाठी रायगड आणि चाकण येथे ऑक्सीजन साठा आरक्षित- हेमंत पाटील

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्याला ऑक्सीजन कमी पडू देणार नाही अशी ग्वाही खासदार हेमंत पाटील यांनी दिली.

राजेश दार्वेकर

हिंगोली : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्याला ऑक्सीजन कमी पडू देणार नाही अशी ग्वाही खासदार हेमंत पाटील यांनी दिली. याबाबत राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त परिमलसिंह यांच्यासोबत मुंबई येथे झालेल्या बैठकीत हिंगोली जिल्ह्यासाठी रायगड आणि चाकण येथे १० मेट्रिक टन ऑक्सीजन साठा आरक्षित करुन ठेवण्यात आला आहे.

हिंगोली जिल्ह्यासाठी अद्यापपर्यंत कुठेही ऑक्सीजन साठा राखीव करुन ठेवण्यात आला नव्हता खासदार हेमंत पाटील यांच्या प्रयत्ननाने साठा राखीव करुन ठेवण्यात आला हे विशेष. जिल्ह्यात मात्र प्रशासनाची कोरोना परिस्थती विस्कटल्यानंतर खासदार पाटील यांनी तातडीने सर्व सूत्रे हाती घेतली आणि योग्य त्या उपाय योजना करण्यासाठी तातडीने जिल्ह्यातील आजी- माजी आमदारांची बैठक बोलावाली. या बैठकीला आमदार संतोष बांगर, आमदार तानाजी मुटकुळे, माजी आमदार गजानन घुगे, माजी आमदार रामराव वडकुते, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दीपक मोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनवंतकुमार माळी, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, जिल्हा नगररचना अधिकारी रामदास पाटील उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर, अतुल चोरमारे यांची उपस्थिती होती.

हेही वाचा - जिल्हा शासकीय रुग्णालयातील ऑक्सीजन प्लॅन्टचा पाईप फुटल्याची घटना मंगळवारी (ता. 27) रात्री 12 वाजण्याच्या सुमारास घडली.

या बैठकीत त्यांनी जिल्ह्यात वाढत असलेल्या कोरोनाच्या परिस्थितीच्या दृष्टीने अनेक मुद्दे मांडले. हिंगोली जिल्ह्याकरिता ऑक्सीजन आणि रेमडेसीवीर इंजेक्शन साठा आरक्षित करुन ठेवण्यात आला नव्हता. ऑक्सीजन पुरवठ्याबाबत मुंबई येथे नुकतीच राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त परिमलसिंह यांच्यासोबत झालेल्या बैठकीत जिल्ह्यासाठी रायगड येथील जेएसडब्लू कंपनीत पाच मेट्रिक टन आणि चाकण येथील आयनॉक्स कंपनीत पाच मेट्रिक टन असा १० मेट्रिक टन साठा आरक्षित करुन ठेवण्याबाबत चर्चा झाली आणि यास तात्काळ मंजुरी देण्यात आली.

त्याच पार्श्वभूमीवर वसमत, कळमनुरी येथे पाच केएल, औंढा आणि सेनगाव येथे दोन केएल तर हिंगोली जिल्हा रुग्णालयात १३ केएल क्षमतेचे ऑक्सीजन टँक बसवण्याकरिता राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याशी संपर्क साधून मंजुर मिळाली आहे. लवकरच हे प्लांट कार्यान्वित करण्यात येणार आहेत. तसेच जिल्ह्याला कोणत्याही क्षणी ऑक्सीजनचा साठा लागू शकतो त्यामुळे तातडीने साठा पाठवून देण्यासाठी आणि वाहतूक करण्यासाठी वाहतूकदार उपलब्ध नसल्याने याबाबत राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे ऑक्सीजन टँकर उपलब्ध करुन देण्याकरिता संपर्क साधला होता यावर परिवहन मंत्र्यांनी सर्वोतोपरी मदतीचे आश्वासन दिले.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RR vs CSK: सिक्स मारल्यानंतरही शिवम दुबेला कसं केलं आऊट? रवींद्र जडेजा म्हणाला, 'त्याला नेट्समध्ये गोलंदाजी केलीये, माहित होतं तो...'

RR vs CSK: वैभव सूर्यवंशीचा चेन्नईविरुद्ध झंझावात! विक्रमी अर्धशतक करत राजस्थानला मिळवून दिला 'रॉयल' विजय

लाडकी बहीण योजनेतून ७१ लाख महिला बाहेर, Ekyc साठी उरले फक्त २४ तास

IPL 2026: ७ वर्षे अन् २७७ सामने... CSK च्या बाबतीत पहिल्यांदाच घडली अशी घटना

खरात बोलतात तसं घडतं! माणिकराव कोकाटेंबद्दल तंतोतंत भविष्यवाणी केलेली; नामकर्ण आवारेंच्या पुस्तकात १३ पानं खरातवर

SCROLL FOR NEXT