Latur News
Latur News 
मराठवाडा

कोल्हापूरच्या तरुणांची उदगीर ते पानिपत शौर्ययात्रा सुरू : पाहा Video

युवराज धोतरे, उदगीर

उदगीर (जि. लातूर) : मराठ्यांच्या पराक्रमाच्या इतिहासाला उजाळा देण्यासाठी कोल्हापूर येथील इतिहास प्रेमींनी काढलेल्या उदगीर ते पानिपत शौर्ययात्रेची सुरुवात बुधवारी (ता.८) येथील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातून झाली.

शहरातील शाहू महाराज सैनिकी विद्यालयातून किल्ल्यापर्यंत शोभायात्रा काढण्यात आली होती. कृष्णकांत चौक देगलूर रोड येथून शहरातील विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी इतिहासकालीन देखावे, ज्ञानदेव, तुकाराम, छत्रपती शिवराय, जिजाऊ यांचा वेश परिधान करून पदयात्रेत सहभाग नोंदवला.

पानिपतच्या लढाईसाठी मराठे ज्या मार्गाने पानिपतला गेले, त्याच मार्गाने ही यात्रा जाणार आहे. ज्या ठिकाणी पानिपत युद्धासाठी सैनिकांचे पडाव पडले होते, त्या ठिकाणी शौर्ययात्रेमध्ये नामवंत इतिहासतज्ञ पानिपत रणसंग्रामाची माहिती देणार आहेत.

उदगीरहून ही यात्रा निघून परतूर, बुर्‍हाणपुर, देवास, गुणा, ग्वाल्हेर, कुरुक्षेत्र व पानिपत येथे 14 जानेवारी रोजी  पोहचणार आहे. 14 जानेवारीपर्यंत प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी कोल्हापूर येथील युवक शिवकालीन मर्दानी खेळ सादर करणार आहेत. आपल्या युद्धातील सैनिकांचे, मावळ्यांचे कौशल्य कसे होते याचे प्रात्यक्षिक सादर करणार आहेत. 

उदगीरच्या विजयाच्या इतिहासाशिवाय पानिपतचा इतिहास पूर्णच होवू शकत नाही. म्हणूनच शौर्ययात्रेचा शुभारंभ उदगीर येथौन झाल्याचे यावेळी सांगण्यात आले. 

यांची विशेष उपस्थिती

यावेळी पानिपतकार विश्वास पाटील, कोल्हापूरहून आलेले उदय मोरे, रवी माने, अश्विनी भिडे, प्रकाश पाटील, इंद्रजित नागेशकर, पंडित पवार यांच्यासह उदगीर येथील बसवराज पाटील नागराळकर, जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे, नगराध्यक्ष बसवराज बागबंदे, बाजार समितीचे सभापती सिद्धेश्वर पाटील, खरेदी-विक्री संघाचे सभापती भरत चांमले, मुख्याधिकारी भारत राठोड, पोलीस उपअधीक्षक मधुकर जवळकर, शहर पोलीस निरीक्षक महेश शर्मा, संयोजन समितीचे अध्यक्ष प्रा.डॉ .संजय मुळे, महानंदा सोनटक्के, सभापती मनोज पुदाले, दत्ताजी पाटील, रमेश अंबरखाने, डॉ दत्ता पाटील,  मोतीलाल डोईजोडे, धनंजय गुडसूरकर, अनिता येलमटे, चंदन पाटील नागराळकर, सुदर्शन मुंढे आदी यावेळी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबाद पुन्हा 200 पार! रेड्डी अन् क्लासेननं स्लॉग ओव्हरमध्ये राजस्थानला धुतलं

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT