dhananjay munde and pankaja munde dhananjay munde and pankaja munde
मराठवाडा

स्वप्नातही वाटल नव्हतं की मंत्री व्हावे लागेल, पंकजांचा धनंजय मुंडेंना टोला

'अहो विरोधी पक्षनेते असताना फक्त प्रश्न विचारायचे शिकलात !'

सकाळ डिजिटल टीम

बीड : अहो विरोधी पक्षनेते असताना फक्त प्रश्न विचारायचे शिकलात. कधी स्वप्नातही वाटलं नव्हत की आपल्याला मंत्री व्हावे लागेल आणि उत्तर द्यावे लागलं. मंत्र्याला उत्तर द्यावे लागतात, असा सल्ला भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी सामाजिक न्यायमंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे यांना दिला आहे. आज गुरुवारी (ता.२७) अंबाजोगाई येथे नवनिर्वाचित नगरसेवकांच्या सत्कार समारंभात त्या बोलत होत्या. मुंडे म्हणाल्या, मी प्रश्न विचारायचे काय आणि तुम्ही वेगळच बोलायचे. आम्ही तुमच्यावर आरोप करायचे नाही तर कोणावर करायचे? तर तुम्ही सांगा मला काही अधिकार नाहीत. मी नामधारी मंत्री आहे. मी माझ्या आयुष्यात काही करु शकणार नाही. आम्ही एका शब्दाने पुढचे तीन वर्ष नाव घेणार नाही. (Pankaja Munde Attack On Dhananjay Munde Over Development Politics In Beed)

तुम्ही जर पालक आहात. जिल्ह्यात वाळूमाफीयांचा गोंधळ चाललायं. आम्ही कोणाला विचारणार? एक अधिकारी म्हणतो, की आम्हाला संरक्षणासाठी रिव्हाॅल्वर द्या. आम्ही कोणाला जाब विचारणार? आम्ही कोणते रस्ते केले आणि कोणते रस्ते नाही केले, याचं श्रेय घेण्यापेक्षा स्वतः रस्त्यावर ये ना. स्वतः विकास करा ना. जेवढे प्रश्न विचारले तेवढ्याच प्रश्नांचे उत्तर द्या. सभागृहात जसे उत्तर द्यावे लागतात तसे जनतेच्या सभागृहात उत्तर द्यावे लागतात, असा टोला त्यांनी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना लगावला.

आम्ही बोलतो एक तुम्ही बोलता दुसरं, त्याची बातमी होऊ शकते. पण जनता फार हुशार आहे. त्यातल्या त्यात बीड (Beed) जिल्ह्यातील जनता फार हुशार आहे. आम्हालाही बीड जिल्ह्यातील जनतेची प्रचंड धाक आहे. आता तुम्ही जर जनतेच्या हिताचे कामे केली तर आम्ही जाहीरपणे शाबासकी देऊ. जर तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना पोसण्यासाठी आणि घर भरण्यासाठी ही सत्ता आणली असेल तर ते योग्य नाही, असा संताप पंकजा मुंडे यांनी पालकमंत्र्यावर व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway Traffic Jam: मुंबई-पुणे ‘द्रुतगती महामार्गा’वर गॅस टँकर उलटला!, मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प

WPL 2026: जेमिमाहची दिल्ली कॅपिटल्स सलग चौथ्यांदा फायनलमध्ये, गुजरातचा केला पराभव; जेतेपदासाठी RCB शी लढणार

Mumbai Airport incident : मुंबई एअरपोर्टवर भीषण विमान दुर्घटना टळली! ; एअर इंडिया अन् इंडिगो विमानांची पंख एकमेकांना धडकली

मोठी बातमी! ‘टीईटी’त साडेचार लाखातील चार लाख भावी शिक्षक नापास; मराठीचा १२ टक्के तर इंग्रजीचा निकाल ५.४४ टक्के, ३६ जणांचा निकाल ठेवला राखून, वाचा...

Pune Traffic : जेधे चौकात जीव धोक्यात! अतिक्रमण, बेशिस्त वाहनचालकांमुळे पादचाऱ्यांची रोजची कसरत

SCROLL FOR NEXT