संग्रहित छायाचित्र 
मराठवाडा

बीड जिल्हा पुन्हा गुंडगिरीकडे, पण खपवून घेणार नाही- पंकजा मुंडे 

सकाळ वृत्तसेवा

बीड - सामान्यांच्या हिताचे निर्णय सरकारने घेतले तर कौतुक करू, पाठीशीही राहू, वाईट केले तर पाठीत धपाटा मारू, असे म्हणत जिल्ह्याची मान खाली जाईल, असे काम कोणत्याही नेत्याने करू नये, असे आवाहन करून संघर्षाचा वारसा असल्याने पराभवाने खचणार नाही, असे प्रतिपादन माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी केले. बीड जिल्हा पुन्हा गुंडगिरीकडे वळू लागला आहे, हे दुर्दैव असल्याचेही त्या म्हणाल्या. 

भाजपचे नूतन जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या ‘संघर्षयोद्धा’ संपर्क कार्यालयाचे उद्घाटन शुक्रवारी (ता. २१) पंकजा मुंडे यांच्या हस्ते झाले. या वेळी खासदार डॉ. प्रीतम मुंडे, आदिनाथ नवले, केशव आंधळे, अक्षय मुंदडा, रमेश पोकळे उपस्थित होते. पंकजा मुंडे म्हणाल्या, जिल्ह्यातील विरोधकांना आपण कधी त्रास दिला नाही. जाती-पातीच्या राजकारणाला थारा देऊ नका, पराभवातून आपण खचून जाणारे नाहीत. गोपीनाथराव मुंडेंनी संघर्ष करायला शिकविले आहे. संघर्ष या भूमीचा गुण असून आपण संघर्ष करत राहणार आहोत. मराठवाड्याच्या पाणीप्रश्‍नाबाबतची भूमिका तत्वाची असून त्यासाठी सर्वांना सोबत घेऊ. 

बीड जिल्हा पुन्हा गुंडगिरीकडे वळू लागला हे दुर्दैव असल्याचेही पंकजा मुंडे म्हणाल्या. मागच्या पाच वर्षांत जिल्ह्याचे नाव फार मोठे झाले. मुलींची संख्या वाढली, विकासाची कामे झाली, पीकविम्यामध्ये राष्ट्रीय पुरस्कार मिळवला. गुंडगिरीचा सामान्यांना त्रास होत आहे. सरकार, पालकमंत्री येतात-जातात; पण सामान्यांना त्रास होऊ नये. सामान्यांचा त्रास खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. 

महाविकास आघाडीचे सरकार जुन्या सरकारच्या योजना बंद करण्यात बिझी आहे. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष आदित्य सारडा, सविता गोल्हार, जयश्री मस्के, मोहन जगताप, स्वरूपसिंह हजारी, नवनाथ शिराळे, भारत काळे, विजयकांत मुंडे, अशोक लोढा, सुलोचना वाव्हळ, स्वप्नील गलधर, जगदीश गुरखुदे, राजेंद्र बांगर, सर्जेराव तांदळे, भगीरथ बियाणी, विक्रांत हजारी, अजय सवाई, सलीम जहागीर, लक्ष्मण जाधव आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT