pankaja pankaja
मराठवाडा

विधानसभेतील पराभव अल्पविराम आहे पुर्णविराम नाही- पंकजा मुंडे

सरकारने मराठा समाजाची चेष्टा केल्याचेही मत पंकजांनी मांडले

प्रमोद सरवळे

बीड: आज (३ जून) भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचा स्मृतीदिन आहे. यानिमित्त गोपीनाथ मुंडेंच्या नावाच्या पोस्टल लिफाफ्याचं लोकार्पण करण्यात आले आहे. यावेळी बोलताना पंकजा मुंडेंनी सरकारवर टीका केली आहे. 'आरक्षणाबाबतीत सरकारने स्पष्ट भूमिका करावी. आता आरक्षणाच्या नावावर सरकारने राजकारण थांबवले पाहिजे. त्यामुळे मी आता या मुद्द्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाणार असल्याचे पंकजा मुंडेंनी सांगितले.

पंकजा म्हणाल्या, 'मुख्यमंत्र्यांना भेटीसाठी वेळ मागून आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करणार आहे. विधानसभेतील पराभव हा अल्पविराम आहे पुर्णविराम नाही. सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकार फक्त राजकारण करत आहे. सरकारने मराठा समाजाची चेष्टा केली आहे'

भारतील टपाल विभागाने गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी त्यांच्या नावे लिफाफ्याचे लोकार्पण केले. 'कोरोनाचे नियम पाळून आम्ही गावागावात जाणार आहे आणि आरक्षणासंबंधी लोकांची मते जाणून घेणार आहोत. निवडणूक घ्यायच्या असतील तर पहिले आरक्षणाचा मुद्दा सोडवावा मगच निवडणुका घ्या असा इशारा पंकजा मुंडेंनी सरकारला दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

मोठी बातमी! भाजपकडून ३ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT