Pankaja Munde And Pritam Munde esakal
मराठवाडा

मुंडे भगिनींनी घेतले योगेश्वरी देवीचे दर्शन,देवीला घातले साकडे

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, खासदार डाॅ. प्रितम मुंडे यांनी बुधवारी (ता.१३) नवरात्रातील आष्टमीनिमित्त श्री योगेश्वरी देवीचे दर्शन घेतले.

प्रशांत बर्दापूरकर

अंबाजोगाई (जि.बीड) : भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde), खासदार डाॅ. प्रितम मुंडे (Pritam Munde) यांनी बुधवारी (ता.१३) नवरात्रातील आष्टमीनिमित्त श्री योगेश्वरी देवीचे दर्शन घेतले. आई योगेश्वरी अतिवृष्टीने बळीराजावर आलेले संकट दूर कर, कोरोना नष्ट होऊ दे, असे साकडे त्यांनी देवीला घातले. नवरात्रोत्सवानिमित्त पंकजा मुंडे व खासदार डॉ.प्रितम मुंडे यांनी परंपरेनुसार योगेश्वरी देवीचे (Yogeshwari Devi) दर्शन घेतले. योगेश्वरी देवीची मनोभावे (Beed) पूजाअर्चा करून त्यांनी दर्शन घेतले.

अन्नदात्या बळीराजाला सर्व संकटातून मुक्त कर आणि कोरोनाचे संकट टळू दे, अशी प्रार्थनाही त्यांनी देवीच्या चरणी केली. यावेळी आमदार नमिता मुंदडा, अक्षय मुंदडा, गयाताई कराड, भाजपचे तालुकाध्यक्ष अच्युत गंगणे, गणेश कराड, नेताजी देशमुख, कमलाकर कोपले, शाम आपेट, हिंदूलाल काकडे, सुनील लोमटे, संजय गंभीरे यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

(पूर्ण.. )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Cotton Market : कापूस बाजारात 'मंदीची' सरकी; १५ लाख गाठींचे उद्दिष्ट असताना साडेसात लाखांवरच हंगाम आटोपला!

रायगडाच्या पायवाटेवर 'कमळी'चा स्वराज्याचा जागर! चित्रीकरणादरम्यान विजया बाबर झाली भावूक; म्हणाली...

Jalgaon News : जळगावात थरार! सिलिंडरच्या स्फोटात तीन घरे जळून खाक, डोळ्यांदेखत संसाराची झाली राखरांगोळी

Latest Marathi News Update : भारतात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X क्रॅश

Sunil Tatkare On NCP: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार का? भवितव्य सांगून सुनील तटकरेंचं मोठं वक्तव्य; काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT