Pankaja Munde And Mahadev Jankar 
मराठवाडा

महादेव जानकरांना उद्देशून पंकजा मुंडे म्हणाल्या, आता या जोडीला तरी दृष्ट लागू नये

ई सकाळ टीम

बीड : माझे बुंध महादेव जानकर येथे उपस्थित आहेत. त्यांच्याशिवाय माझा कुठलाही कार्यक्रम कधी पूर्ण होत नाही. आता या जोडीला तरी दृष्ट लागू नये, अशी अपेक्षा भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली. राष्ट्रसंत भगवानबाबा यांच्या जन्मगावी सावरगाव घाट येथे रविवारी (ता.२५) झालेल्या ऑनलाइन दसरा मेळाव्यात त्या बोलत होत्या.

मुंडे म्हणाल्या, की मी राजकारण सोडले, घरात बसले असा अपप्रचार झाला. मात्र मी शर्यतीत असेन आणि तोडणाऱ्यांनाही उत्तर देईन. अभिमन्यूला अर्धज्ञान असल्याने तो चक्रव्यूहात अडकला. मात्र मला चक्रव्यूह भेदता येतो. एक दिवस हा मेळावा शिवतीर्थावर घेऊन मैदान भरवून दाखवू, असा हल्लाबोल भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी केला. यावेळी खासदार भागवत कराड, माजी मंत्री महादेव जानकर, आमदार मोनिका राजळे, मेघना बोर्डीकर, भीमराव धोंडे, रमेशराव आडसकर, अक्षय मुंदड, केशव आंधळे, राहुल केंद्रे आदी उपस्थित होते.

मी शर्यतीत असेन आणि तोडणाऱ्यांनाही उत्तर देईन, पंकजा मुंडेंचा हल्लाबोल

ऊसतोड मजूर संपावरूनही हल्लाबोल
ऊसतोडणी कामगारांच्या संघटना आपल्यासोबतच असून दोन बैठकांत मिटणारा प्रश्न दोन महिने का लांबला? मुंबईत बसून निर्णय होत नाहीत तर ढाब्यावर बसून होतात का, असा सवाल पंकजा मुंडे यांनी केला. ज्येष्ठ नेते शरद पवार तसेच जयंत पाटील, जयप्रकाश दांडेगावकर यांच्यासोबत चर्चा झाली असून पुढेही करू. ऊसतोड कामगारांच्या घामाची जाण आहे. लाचारी नको, स्वाभिमान म्हणून ऊसतोडणीस जा, असे मी मजुरांना सांगितले. लोक बैठकीनंतर बघू म्हणतात. तुमचा आकडा सांगा, पक्षाचे पत्रक काढून, दौरा करून काय झाले, असा सवालही त्यांनी नाव न घेता पक्षविरोधकांना केला. ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावर काम करणाऱ्यांना यूपीत पाठवू, असा टोलाही त्यांनी लगावला. तुमच्या २७ तारखेच्या बैठकीनंतर मी काय ते ठरवीन, असा इशाराही दिला.


संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Budget 2026: मोठी बातमी! २६ वर्षात पहिल्यांदाच रविवारी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार

Vasai Virar Election : वसई-विरार महापालिका निवडणूक; उमेदवारांच्या मालमत्तेचे रहस्य जाहीर; अब्जाधीशांचा समावेश!

BMC Election: महायुती मैदानात, पण ठाकरे बंधू...! जाहीरनामा झाला, प्रचार कुठे? प्रचारात उशीर ठाकरेंना महागात पडणार का?

Junnar Crime : जुन्नरच्या निमगिरीत जमिनीच्या वादाचा रक्तरंजित शेवट; फरार आरोपी २४ तासांत पुण्यातून अटकेत!

MCA CET Registration : २०२६-२७ साठी एमसीए व एम.एचएमसीटी सीईटी अर्ज सुरू!

SCROLL FOR NEXT